Haryana CM Manohar Lal Khattar Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant ला वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरचा सन्मान, CM खट्टर यांनी प्रजासत्ताक दिनी दिला पुरस्कार

Haryana CM Manohar Lal Khattar: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला.

दैनिक गोमन्तक

Team India Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचे प्राण वाचवल्याबद्दल हरियाणा रोडवेजचे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांचा सन्मान केला.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चाहत्यांनी ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, यमुना नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ड्रायव्हर सुशील आणि कंडक्टर परमजीत उपस्थित होते, जिथे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले. या दोघांना उत्तराखंड (Uttarakhand) सरकारनेही सन्मानित केले आहे. डेहराडूनमध्ये आयोजित कार्यक्रमाला दोघांचे नातेवाईक पोहोचले. जिथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशंसा पत्र देऊन 50-50 हजार रुपये दिले.

पंत आपल्या संदेशात म्हणाला होता

दुसरीकडे, पंतने ट्विटरववरुन आपल्या भावना प्रकट केल्या होत्या. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, 'तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी कृतज्ञ आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की, माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता यातून सावरण्याचा कालावधी सुरु झाला आहे. मी पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय (BCCI), जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांना अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT