Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: ऋषभ पंतने दिली खूशखबर, आशिया कपमध्ये टीम इंडियाची वाढणार ताकद!

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 ची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 ची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने टीम इंडियाला एक खूशखबर दिली आहे.

डिसेंबर 2022 पासून पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तूफान व्हायरल होत आहे.

ऋषभ पंतने टीम इंडियाला दिली मोठी बातमी

दरम्यान, टीम इंडियाला (Team India) पुढील तीन महिन्यांत आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

दरम्यान, पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंजत आहेत.

आशिया चषकापूर्वी या दोन खेळाडूंचे फिट होणे ही टीम इंडियासाठी मोठी बातमी आहे. हे दोन्ही खेळाडू संघाच्या मोठ्या मॅचविनरपैकी एक आहेत. व्हिडिओ शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बर्‍याच दिवसांनी लाईव्ह क्रिकेट मॅच पाहताना मजा आली.'

2023 मध्ये आशिया कपला संधी मिळू शकते

दुसरीकडे, श्रेयस अय्यरला आयपीएल 2023 पूर्वी दुखापत झाली होती. एप्रिलमध्ये अय्यरच्या पाठीवर ब्रिटनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

त्याचवेळी, केएल राहुलला (KL Rahul) आयपीएल 2023 च्या मध्यात दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून माघार घेतली होती. असे मानले जात आहे की, हे दोन्ही खेळाडू अशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाचा भाग बनू शकतात.

ऋषभ पंतही पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कार अपघातातून ऋषभ पंत अजूनही सावरत आहे. पंत सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे. पूर्ण तंदुरुस्त होण्याच्या प्रवासात तो एक-एक पाऊल टाकत आहे.

वृत्तानुसार, ऋषभ पंतने नेटमध्ये सुमारे 140 किमी प्रतितास वेगाने चेंडूंचा सामना करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर त्याने यष्टिरक्षणाचा सरावही सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

SCROLL FOR NEXT