Rishabh Pant - Rohit Sharma X
क्रीडा

Rishabh Pant: 'क्रिकेट सोडशील तेव्हाच तुला...', ऐतिहासिक गॅबा कसोटी जिंकल्यावर पंतला काय म्हणालेला रोहित?

Rohit Sharma: तीन वर्षांपूर्वी गॅबा कसोटीत ऋषभ पंतने विजयी चौकार मारल्यानंतर रोहित शर्मा त्याला काय म्हणालेला, याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant opened up about Rohit Sharma words after Team India Gabba win against Australia:

भारतीय क्रिकेट संघाने आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. यातील एक म्हणजे जानेवारी 2021 मध्ये ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय. 2020-21 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता.

या दौऱ्यात भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेनवरील गॅबा मैदानात मिळवला होता. यासह भारताने तीन दशके ऑस्ट्रेलियाचा गॅबावर अपराजीत राहण्याच्या विक्रमाला धक्का दिला होता.

याबरोबरच भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यामुळे भारतासाठी हा विजय खास होता. ब्रिस्बेन कसोटीच्या विजयात ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो या सामन्याचा सामनावीरही ठरला होता.

दरम्यान, या विजयाला आता तीन वर्षे पूर्ण झाले असून पंतने याबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंत म्हणाला, मला लक्षात आहे की रोहित शर्माने काय म्हटले होते. मला खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण मला रोहितने म्हटलेलं चांगलं लक्षात आहे. तो माझ्या रिऍक्शन पाहात होता. सर्वजण खूश होते. पण तो बाकीच्यांसारखं मी त्याला उत्साहित दिसत नव्हतो.

'तो मला म्हणाला, 'मला वाटत नाही की तुला तू काय केलं आहे, याची कल्पना आहे.' मी त्याला म्हटलं 'आपण एक सामना जिंकलोय आणि दुसऱ्यांदा मालिका जिंकलोय.' त्यानंतर रोहित म्हणाला, 'जेव्हा तू क्रिकेट सोडशील, तेव्हा तुला या खेळीचं महत्त्व समजेल, तुला माहित नाहीये की तू काय केलं आहेस."

पंत पुढे म्हणाला, 'त्यानंतर मला जाणवलं की मी काय केलं होतं.'

या सामन्यापूर्वीच भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मुलीच्या जन्मासाठी मायदेशी परतलेला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत होता. तर अनेक वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त होते. त्यामुळे या सामन्यासाठी युवा खेळाडू भारतीय संघाकडून खेळत होते.

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी दुसऱ्या डावात ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आधी शुभमन गिल (91) आणि चेतेश्वर पुजाराने (56) सुरुवात करून दिली होती.

त्यानंतर पंतने आक्रमक खेळताना अखेरच्या दिवशी नाबाद 89 धावा केल्या होत्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्याने 97 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लाँग-ऑफला चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT