Rishabh Pant Accident: 'फोन आला अन् वाटलं पंत गेला...', अपघाताचं कळताच काय होत्या भावना, अक्षरचा खुलासा

Axar Patel: ऋषभ पंतचा अपघात झाल्याचे कळताच पहिला विचार काय आलेला याबद्दल अक्षर पटेलने खुलासा केला आहे.
Rishabh Pant - Axar Patel
Rishabh Pant - Axar PatelX/DelhiCapitals
Published on
Updated on

Axar Patel recalls first thought when heard about Rishabh Pant's accident:

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा गंभीर कार अपघात होऊन आता वर्ष उलटून गेले आहे. पण त्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. 2023 वर्षाच्या अखेरीस दिल्ली-रुडकी हायवेवर पहाटे डिव्हायडरला धडकून त्याचा अपघात झाला होता. त्या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता. गाडीतून तो बाहेर येताच त्याची कार पूर्ण जळाली होती.

अपघात पहाटे झाल्याने सकाळपर्यंत ही बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर सर्वांनीच त्याच्यासाठी त्याच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी आशा व्यक्त केली होती.

दरम्यान, या अपघाताची माहिती जेव्हा पहिल्यांदा कळाली तेव्हा काय विचार मनात आला, याबद्दल भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने खुलासा केला आहे. याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rishabh Pant - Axar Patel
Rishabh Pant: पंतने दिले कमबॅकचे संकेत! अपघातानंतर धुवांधार बॅटिंग करताना पहिल्यांदाच Video आला समोर

पंत आणि अक्षर मैदानाबाहेरही चांगले मात्र असून आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सकडून एकत्र खेळतात. दरम्यान, पंतच्या अपघाताबद्दल पहिल्यांदा अक्षरला माहिती वेगवान गोलंदाज इशांत शर्माची पत्नी प्रतिमाने दिली होती.

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षर पटेलने सांगितले की "सकाळी ७ किंवा ८ वाजले असतील, तेव्हा माझ्या फोनची रिंग वाजली. प्रतिमा दिदीचा फोन होता. प्रतिमा दिदीने मला विचारले की 'तुझी ऋषभबरोबर शेवटचे बोलणे कधी झाले होते.'

मी म्हटलं, 'काल मी करणार होतो, पण नाही केला फोन.' त्यानंतर ती म्हणाली, 'जर त्याच्या आईचा फोन नंबर असेल, तर मला सेंड कर, त्याचा अपघात झाला आहे.' त्यावेळी माझ्या डोक्यात पहिला विचार आला की हा भाऊ गेला."

Rishabh Pant - Axar Patel
Dhoni-Pant Photo: सरत्या वर्षाला निरोप ! धोनी-पंत अन् अब्दू रोझीकचं बॉलिवूड कलाकारांबरोबर धमाल सेलिब्रेशन

दरम्यान, या अपघातत पंतला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे त्याला गेल्या वर्षभरात क्रिकेट खेळता आलेले नाही. सध्या तो त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. तसेच पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

नुकतेच आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतनेही या अपघाताबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला, 'माझा ज्याप्रकारे अपघात झाला, त्यातून मी वाचणे हे माझे सुदैव होते. रिकव्हरी होत असताना अर्धा काळ आव्हानात्मक होता, कारण वेदना होत होत्या. पण आता रिकव्हरी चांगली होत आहे.'

दरम्यान, पंत आयपीएल 2024 स्पर्धेतून पंत पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही करेल असेही म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com