Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: निवड समितीचा धक्कादायक निर्णय, श्रीलंका मालिकेतून 'या' मोठ्या मॅचविनरला डच्चू

Team India Squad For Sri Lanka Series: भारतीय निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Team India Squad For Sri Lanka Series: भारतीय निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दोन्ही मालिकेसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत. पण या दोन्ही संघात मोठा सामना जिंकणाऱ्या खेळाडूला स्थान मिळालेले नाही. हा खेळाडू नुकताच बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघासाठी मोठा मॅचविनर ठरला होता. निवड समितीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या खेळाडूला श्रीलंका मालिकेतून वगळण्यात आले होते

श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळल्या जाणाऱ्या या दोन्ही मालिकांसाठी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि ईशान किशनसारखे युवा खेळाडू संघाचा भाग बनले आहेत. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंत सातत्याने फ्लॉप ठरत होता, त्यामुळे भारतीय निवड समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पंतची आकडेवारी

ऋषभ पंतने टीम इंडियासाठी (Team India) आतापर्यंत 30 एकदिवसीय सामने खेळले आहेत, या सामन्यांमध्ये त्याने 34.6 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकली आहेत. त्याचवेळी, त्याने भारतासाठी एकूण 66 टी-20 सामने खेळले असून 22.43 च्या खराब सरासरीने 987 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतके आहेत.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT