Gujarat Accident: पर्यटनावरुन परतताना काळाचा घाला! कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक; लष्करी जवानाच्या कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Gujarat Highway Accident 7 Family Members Killed: राजस्थान पाठोपाठ गुजरातमध्येही भीषण रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Gujarat Highway Accident 7 Family Members Killed
Gujarat Highway AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Gujarat Highway Accident 7 Family Members Killed: राजस्थान पाठोपाठ गुजरातमध्येही भीषण रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर वेकरिया रण परिसराजवळ भरधाव ट्रेलर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचे तुकडे झाले. या अपघातात दोन पुरुष, दोन महिला आणि तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.

खावडा येथून पर्यटनाचा आनंद घेऊन परतणाऱ्या या कुटुंबातील सदस्य उत्तराखंडमध्ये कार्यरत असलेल्या एका लष्करी जवानाचे असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत जवानाच्या एका नातेवाईकाचाही मृत्यू झाला. अपघाताच्या (Accident) धक्क्याने कारमधील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले आणि मदतकार्य सुरु होण्यापूर्वीच सात जणांची प्राणज्योत मालवली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले आणि पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलवेपर्यंत बराच उशीर झाला.

Gujarat Highway Accident 7 Family Members Killed
Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचा वेग जास्त होता आणि पुढील वाहनाला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या नादात ही समोरासमोर धडक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरुन पसार झाला असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ट्रेलरच्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी मालकाचा शोध सुरु केला. धोरडो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून, कार आणि ट्रेलर ताब्यात घेतले आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरु करण्यात आला असून, पश्चिम कच्छचे पोलिस अधीक्षक विकास सुंडा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.