IND vs SL: हार्दिक पंड्याच होणार टीम इंडियाचा कर्णधार! 'हा' व्हिडिओ पाहून बसेल विश्वास

हार्दिक पंड्याला भारतीय संघाच्या टी20 संघाचे कर्णधारपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
Hardik Pandya | IND Vs SL Updates | Team India's T20I captain
Hardik Pandya | IND Vs SL Updates | Team India's T20I captainDainik Gomantak

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आशिया चषक 2022 विजेत्या श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका 3 ते 15 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकांसह भारतीय संघाचा मायदेशातील हंगाम सुरू होईल.

दरम्यान टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने या शक्यतेला दुजोराही मिळत आहे.

Hardik Pandya | IND Vs SL Updates | Team India's T20I captain
Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

या मालिकेचे प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ मालिकेच्या प्रोमोचा होता. या प्रोमोमध्ये दिसते की हार्दिक एका स्टेडियममध्ये बसला आहे. तसेच तो सांगत आहे की त्याच्या नेतृत्वात तो श्रीलंकेला जिंकून देणार नाही. विशेष म्हणजे खुद्द हार्दिक पंड्यानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, अद्याप श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण असे असतानाही हा प्रोमो सर्वांसमोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तरी, स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडिओ लगेचच डिलिट केला आहे. पण, चाहत्यांकडून संघातील बदलांबाबत स्टार स्पोर्ट्सला आधीच माहिती दिली गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(Hardik Pandya will become Team India's T20I captain)

रोहित शर्मा - केएल राहुल मालिकांना मुकणार?

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकासांठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेला भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याला बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेदरम्यान हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितला आणखी काही काळ लागणार असल्याचे समजत आहे.

तसेच उपकर्णधार केएल राहुलने लग्नासाठी सुटीची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो देखील या मालिकांसाठी अनुपस्थित असण्याची शक्यता आहे. त्याचमुळे टी20 मालिकेसाठी हार्दिकला कर्णधारपद मिळू शकते.

Hardik Pandya | IND Vs SL Updates | Team India's T20I captain
IPL Auction 2023: स्टोक्स CSK संघात आल्यावर काय होती 'कॅप्टन कूल'ची प्रतिक्रिया, सीईओकडून खुलासा

हार्दिकने यापूर्वी भारतीय संघाचे आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांत, वेस्ट इंडिजविरुद्ध एका सामन्यात आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांत नेतृत्व केले होते. यातील 4 सामने त्याने जिंकले आहेत, तसेच एका सामन्याचा निकाल लागला नव्हता, तर एका सामन्यात बरोबरी झाली होती.

भारत विरुद्ध श्रीलंका वेळापत्रक -

आंतरराष्ट्रीय टी20 मालिका

3 जानेवारी - पहिला टी20 सामना, मुंबई

5 जानेवारी - दुसरा टी20 सामना, पुणे

7 जानेवारी - तिसरा टी20 सामना, राजकोट

वनडे मालिका

10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी

12 जानेवारी - दुसरा वनडे, कोलकाता

15 जानेवारी - तिसरा वनडे, तिरुअनंतपुरम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com