Kusal Mendis  Dainik Gomantak
क्रीडा

SL vs IRE: 6,6,6,6,6,6,6,6,6,6,6..., श्रीलंकेच्या 'या' 28 वर्षीय खेळाडूची कमाल, केला शानदार महा रेकॉर्ड नावावर!

SL vs IRE, 11 Sixes in Test Innings: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा मोठे विक्रम केले जातात. असाच एक विक्रम श्रीलंकेच्या क्रिकेटपटूने केला आहे.

Manish Jadhav

SL vs IRE, 11 Sixes in Test Innings: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा मोठे विक्रम केले जातात. असाच एक विक्रम श्रीलंकेच्या क्रिकेटपटूने केला आहे.

या क्रिकेटपटूने आपल्या डावात 11 षटकार ठोकले. त्याने हा कारनामा टेस्ट फॉर्मेटमध्ये केला. श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा विक्रम झाला.

कसोटी डावात 11 षटकार

श्रीलंकेचा (Sri Lanka) अनुभवी फलंदाज कुसल मेंडिसने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम खेळी केली.

त्याने शानदार द्विशतक झळकावले, आणि यासह त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. कुसल मेंडिसने 291 चेंडूत 18 चौकार आणि 11 षटकारांसह 245 धावा केल्या. श्रीलंकेने पहिला डाव 3 बाद 704 धावा करुन घोषित केला.

संगकाराचा विक्रम मोडला

कुसल मेंडिसने अनुभवी स्टार माजी क्रिकेटर कुमार संगकाराचा (Kumar Sangakkara) विक्रम मोडला. कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा मेंडिस हा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे.

28 वर्षीय मेंडिसने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 11 षटकार मारुन विक्रम केला. यापूर्वीचा, विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता, ज्याने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध एका डावात 8 षटकार ठोकले होते.

श्रीलंका मजबूत स्थितीत

गाले येथे झालेल्या या सामन्यात आयर्लंडने पहिल्या डावात 492 धावा केल्या होत्या. संघाकडून पॉल स्टर्लिंगने 103 आणि कर्टिस कॅम्फरने 111 धावा केल्या तर कर्णधार अँडी बालबिर्नीने 95 धावांचे योगदान दिले.

यानंतर श्रीलंकेने 3 बाद 704 धावा करत पहिला डाव घोषित केला. कुसल मेंडिसने 245 तर सलामीवीर निशान मदुष्काने 205 धावा केल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 111 आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 100 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT