SL vs IRE: श्रीलंकेच्या जादुई फिरकीपटूने पुन्हा घेतले 5 बळी, कसोटी इतिहासात नोंदवले गेले नाव

Prabath Jayasuriya: श्रीलंकेचा डावखुरा जादूई फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने पुन्हा एकदा अप्रतिम फॉर्म दाखवत एकामागून एक 5 विकेट घेत आयर्लंडचे कंबरडे मोडले.
Prabath Jayasuriya
Prabath Jayasuriya Dainik Gomantak

SL vs IRE: श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात गालेमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत एकीकडे फलंदाजांनी आपला जलवा दाखवला, तर दुसरीकडे गोलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली.

श्रीलंकेचा डावखुरा जादूई फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने पुन्हा एकदा अप्रतिम फॉर्म दाखवत एकामागून एक 5 विकेट घेत आयर्लंडचे कंबरडे मोडले.

दरम्यान, जयसूर्याने जेम्स मॅक्युलम, हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, पीजे मूर आणि जॉर्ज डॉकरेल यांची शिकार केली.

प्रभातच्या शानदार गोलंदाजीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आयर्लंड संघाला 45 षटकांत 7 गडी गमावून केवळ 117 धावा करता आल्या.

आयर्लंड सध्या 474 च्या मोठ्या स्कोअरने पिछाडीवर आहे. पहिल्या डावात प्रभातच्या अप्रतिम गोलंदाजीची चर्चा रंगली आहे.

Prabath Jayasuriya
BAN vs IRE: तैजुल इस्लामने केला विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा ठरला जगातील एकमेव गोलंदाज

कोण आहे प्रभात जयसूर्या?

31 वर्षीय डावखुरा गोलंदाज प्रभात जयसूर्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) गाले येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

यानंतर प्रभातची गोलंदाजी पाहता क्रिकेटप्रेमीही अवाक झाले. प्रभात जयसूर्याने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. त्याने सलग तीन डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Prabath Jayasuriya
BAN vs IRE: लिटन दासने केला जबरदस्त रेकॉर्ड, गोलंदाजांना भरली धडकी!

दुसरीकडे, टॉम रिचर्डसन आणि क्लेरी ग्रिमेट यांच्यानंतर कसोटी कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात पाच बळी घेणारा जयसूर्या क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला.

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात 118 धावांत 6 आणि 49 धावांत 6 बळी घेतले. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 5 विकेट घेत एक मोठा विक्रम केला.

प्रभात फक्त सहावा सामना खेळत आहे

तीन कसोटीत 29 बळी घेणारा प्रभात जयसूर्या हा दुसरा गोलंदाज ठरला. तो भारताचा माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणीच्या 31 विकेट्सच्या मागे होता. ऑस्ट्रेलियाच्या चार्ली टर्नरनेही तीन कसोटी सामन्यांत 29 बळी घेतले. विशेष म्हणजे, प्रभातने आतापर्यंत केवळ 5 सामने खेळले आहेत. त्याने 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 33 बळी घेतले. त्याचा हा सहावा सामना आहे. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत 6 सामन्यांच्या 10 डावात 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 4 वेळा 5 आणि एकदा 4 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या दिवशी प्रभात काय चमत्कार करतो हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com