RCB Fans Lathi Charge Video Dainik Gomantak
क्रीडा

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

RCB Fan Celebration Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला.

Sameer Amunekar

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. गुजरातने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने धमाकेदार ७५ धावांची खेळी केली.

या ऐतिहासिक विजयासह आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात सलग दोनदा विजेतेपद मिळवणारा आरसीबी हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) नंतर केवळ तिसरा संघ ठरला आहे.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

या विजयानंतर देशभरात आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. मध्यरात्री आरसीबीच्या शेकडो चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी चाहत्यांना शांत राहण्याचे आणि गर्दी पांगवण्याचे आवाहन केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदाचा मुकुट परिधान केल्यानंतर, आरसीबी संघाने १ जून रोजी बंगळुरूला परत न जाता अहमदाबादमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना संयमाने आणि जबाबदारीने आनंद साजरा करण्याचे आवाहन केले होते. "हा विजय तुमचाच आहे, पण हा क्षण कुटुंबासोबत घरात सुरक्षित राहून साजरा करा," असे संघ प्रशासनाने म्हटले होते.

गुजरात टायटन्सच्या बसला अपघात; खेळाडू थोडक्यात बचावले

दुसरीकडे, अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या गुजरात टायटन्सच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामना संपवून हॉटेलकडे परतत असताना गुजरातच्या टीम बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. पाहता पाहता बसमध्ये प्रचंड धूर कोंडला गेल्याने खेळाडूंमध्ये घबराट पसरली.

मात्र, संघ व्यवस्थापनाने तत्परता दाखवत सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढले. काही वेळ रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर, दुसऱ्या बसने खेळाडूंना हॉटेलवर पोहोचवण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT