Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

Thar Jeep Accident: थार जीपच्या धडकेने एका आठवड्यात तिघांचा बळी गेला असून गेल्या पाच महिन्यांत रस्ते अपघातातील मृत्युंची संख्या १०१ वर पोचली आहे.
Goa Road Accident
Thar Jeep AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: थार जीपच्या धडकेने एका आठवड्यात तिघांचा बळी गेला असून गेल्या पाच महिन्यांत रस्ते अपघातातील मृत्युंची संख्या १०१ वर पोचली आहे. आल्त - मांगोरहिल येथील ला-रोझ इमारतीसमोर शनिवारी एका थार जीपने ठोकरल्याने सासमोळे-बायणा येथील गेनादेवी जैस्वाल या महिलेचा मृत्यू झाला.

वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. तसेच बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून गेनादेवी यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला ओरूले-वास्को येथील थारचालक अभिजीत राणे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ३०) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास

Goa Road Accident
Goa Accident: गोव्यात तामिळनाडूच्या पर्यटकांच्या कारला बसची जोरदार धडक, गरोदर महिलेसह 5 जण जखमी; फरार बस चालकाला पोलिसांनी फार्मागुडीत पकडलं

थारचालक अभिजीत हा तानिया हॉटेलकडून मांगोरहिल चौकाकडे निघाला होता. थार जीप आल्त मांगोरहिल येथील ला- रोझ इमारतीसमोर पोचली असता, तिची धडक समोरून शहर भागाकडे चालत जाणाऱ्या गेनादेवी यांना बसली. या धडकेमुळे गेनादेवी रस्त्यावर पडल्या. डोक्याच्या मागील भागास दुखापत झाल्याने त्यांना त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना एका खासगी इस्पितळात आणि तेथून गोमेकॉत उपचारांसाठी दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक आकांक्षा फडते देसाई पुढील तपास करीत आहेत.

संगीतकार रॉड्रिग्स यांचा उपचारादरम्यान मृत्यू

पणजी, ता. ३१ (प्रतिनिधी) : कांपाल येथे कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेले ज्येष्ठ संगीतकार फाऊस्तो रॉड्रिग्स (वय ६० वर्षे, रा. मिरामार) यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मारिया रॉड्रिग्स या जखमी असून, त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. कांपाल येथे २८ मे रोजी सकाळी क्रेटा कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता. त्यात दुचाकीस्वार फाऊस्तो गंभीर जखमी झाले होते. कारचालक हा पणजीतील ज्येष्ठ नागरिक असून, तो भरधाव वाहन चालवत होता, असे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com