

गोव्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात कार्यरत असलेल्या ‘एआरझेड’ (अन्याय रहित जिंदगी-अर्ज) या संस्थेने ‘अंडरस्टँडिंग सेक्स ट्रॅफिकिंग : बियाँड द मिथ्स’ हे जनजागृतीपर माहितीपुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तिकेत लैंगिक तस्करीचे स्वरूप, त्यामागील गुन्हेगारी साखळी, पीडित महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रचलित गैरसमज, कायदेशीर बाबी, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती दिली आहे. तस्करी रोखण्यासाठी केवळ पीडितांची सुटका पुरेशी नसून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे आणि शोषणातून आर्थिक फायदा मिळविणाऱ्या संपूर्ण यंत्रणेवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे संस्थेने अधोरेखित केले आहे.
सुटका म्हणजे पुनर्वसन नव्हे!
पोलिसांची कारवाई आणि दीर्घकालीन पुनर्वसन यांमध्ये फरक आहे.
महिलेला सुरक्षित निवारा किती काळ मिळतो?
तिला कायमस्वरूपी रोजगार मिळतो का?
मानसिक समुपदेशनाची सुविधा उपलब्ध होते का?
तिची मुले व त्यांची जबाबदारी लक्षात घेतली जाते का?
मूळ राज्यातील भरती करणारे व वाहतूकदार यांच्यावर कारवाई होते का?
पुन्हा तस्करीच्या जाळ्यात ओढले जाण्यापासून संरक्षण मिळते का?
या प्रश्नांची उत्तरे बहुतांश प्रकरणांत नकारार्थी असल्याचे पुस्तिकेत नमूद केले आहे.
लैंगिक तस्करी म्हणजे काय?
पैसे, वस्तू किंवा अन्य आर्थिक लाभाच्या मोबदल्यात लैंगिक सेवा देण्याची देवाणघेवाण.
अनेक व्यक्तींचे लैंगिक संबंध असणे म्हणजे वेश्याव्यवसाय नव्हे.
लैंगिक सेवांच्या मोबदल्यात पैसे किंवा अन्य लाभाची देवाणघेवाण असणे आवश्यक.
फसवणूक, दबाव, धमकी, हिंसा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन शोषण केले जाऊ शकते.
मानवी तस्करीविरोधी पथक (AHTU)
जवळच्या जिल्हा पोलीस कार्यालयाशी किंवा राज्य मानवी तस्करीविरोधी पथकाशी संपर्क साधावा. संशयित तस्करी, शोषण किंवा अत्याचाराची माहिती तातडीने द्यावी.
शोषणाच्या जाळ्यातून बाहेर पडणे कठीण का?
हिंसा आणि नियंत्रण : शारीरिक व लैंगिक हिंसा, धमक्या आणि मानसिक छळ.
भीती : पुन्हा अत्याचार होण्याची, अटक होण्याची किंवा समाजाकडून अपमानित होण्याची भीती.
आर्थिक परावलंबित्व : सुरक्षित निवारा, रोजगार आणि उत्पन्नाचे पर्यायी साधन नसणे.
मानसिक आघात : दीर्घकाळचे मानसिक दडपण आणि भावनिक गुंतवणूक.
सामाजिक एकाकीपणा : कुटुंब आणि मदतीच्या यंत्रणेपासून दूर राहणे.
पीडितेच्या कमाईवर नियंत्रण कोणाचे?
दलाल आणि एजंट: शोषणातील तीन मानसिक अवस्था
विरोध : सुरुवातीला व्यक्ती शोषणास नकार देते. शारीरिक व मानसिक छळातून विरोध मोडून काढला जातो.
जुळवून घेणे : सततचा छळ व बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेऊ लागते.
स्वीकार : कालांतराने परिस्थिती सामान्य वाटू लागते.शोषणातून फायदा मिळवणाऱ्यांशी भावनिक नातेही तयार होऊ शकते.
शोषित महिलांच्या मुलांपुढील आव्हाने
१ असुरक्षितता : आई, पालकांपासून विभक्त होणे, अस्थिर राहणीमान.
२ शिक्षण : शाळेत भेदभाव, शिक्षणात खंड आणि संधींची मर्यादा.
३ सामाजिक कलंक : आईच्या स्थितीमुळे अपमान, सामाजिक बहिष्कार.
४ शोषणाचा धोका : संरक्षण नसल्यास अत्याचार, दुर्लक्ष व तस्करीची शक्यता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.