Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मैदानात उतरताच जडेजाने रचला इतिहास, धोनीच्या निवृत्तीपूर्वी केला मोठा पराक्रम!

Manish Jadhav

CSK vs RR: आयपीएल 2023 चा 37 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे, सीएसकेचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजासाठी हा सामना खूप खास आहे. या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच जडेजाने एका खास क्लबमध्ये एंट्री घेतली आहे.

जडेजा या खास क्लबमध्ये सामील झाला आहे

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आता 300 टी-20 सामने पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

जडेजाने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 30.11 च्या सरासरीने 205 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बॅटने 25.40 च्या सरासरीने 3,226 धावा केल्या आहेत. जडेजाने यापैकी सीएसकेसाठी 150 सामने खेळले आहेत.

सर्वाधिक T20 सामने खेळणारे भारतीय खेळाडू

414 - रोहित शर्मा (Rohit Sharma)

381 - दिनेश कार्तिक

369 - एमएस धोनी

368 - विराट कोहली

336 - सुरेश रैना

322 - शिखर धवन

304 - रविचंद्रन अश्विन

300 - रवींद्र जडेजा*

सीएसकेसाठीही आकडेवारी चांगली आहे

CSK कडून खेळलेल्या सर्वाधिक सामन्यांच्या बाबतीत जडेजा फक्त एमएस धोनी (212*) आणि सुरेश रैना (176) च्या मागे आहे.

जडेजा CSK च्या 2018 आणि 2021 IPL विजयांचा देखील एक भाग आहे. जडेजाने आयपीएलमध्ये 2,000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

जडेजाच्या 205 टी-20 विकेटपैकी 116 आयपीएलमध्ये आहेत. सीएसकेसाठी स्पर्धेत 100 हून अधिक बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.

तर, IPL मध्ये 2,000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेणारा जडेजा हा एकमेव खेळाडू आहे. त्याने बॅटने 2,559 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT