Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: रवींद्र जडेजावर 12 महिन्यांची बंदी? क्रिकेट विश्वात मोठी खळबळ

Ravindra Jadeja: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

Manish Jadhav

Ravindra Jadeja Video Viral, Ball Tampering: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. नागपुरातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांत गुंडाळला.

अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करत 5 बळी घेतले. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर त्याच्यावर 12 महिन्यांची बंदी घालणार का, असा सवालही लोक विचारत आहेत.

जडेजाचा व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

जरी त्याने सामन्याच्या मध्यातच बोटाला काहीतरी लावल्याबद्दल वाद सुरु झाला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

सिराजकडून काहीतरी घेतले आणि बोटाला लावले

जडेजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याचा सहकारी मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेत आहे आणि डाव्या हाताच्या बोटाला घासत आहे. यावर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत आहेत.

एका क्रिकेट चाहत्याने हे व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर शेअर केल्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने प्रतिक्रिया दिली.

टीम पेननेही भाष्य केले

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली- खरं तर, सोशल मीडियावर लोक वेगवेगळी मते मांडत आहेत. काहींनी जडेजा चेंडूशी छेडछाड करत असल्याचे सांगितले, तर काही चाहत्यांनी सांगितले की, तो त्याच्या बोटाला मलम लावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT