IND vs AUS: वेलकम बॅक जड्डू! पहिल्या कसोटीत 5 विकेट्ससह ऑसींना दणका, पाहा कशी घेतली स्मिथची विकेट; Video

रविंद्र जडेजाने नागपूर कसोटीत 5 विकेट्स घेतल्या, यात स्मिथ-लॅब्युशेनच्या विकेटचाही समावेश आहे.
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Dainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Jadeja: गुरुवारी (9 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर खेळवण्यात येत असून पहिल्याच डावात रविंद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

जडेजाच्या 5 विकेट्स

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्यां संघाला पहिल्या डावात 63.5 षटकात 177 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवले. भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 22 षटकांत 47 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 8 षटके निर्धाव टाकली.

Ravindra Jadeja
IND vs AUS Video: शमी-सिराजचे ऑसी ओपनर्सला जबरदस्त धक्के! पहिल्या कसोटीत टीम इंडियाची दमदार सुरुवात

पाच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जडेजाने सर्वात आधी खेळपट्टीवर स्थिर झालेल्या मार्नस लॅब्युशेनला बाद केले. जडेजाने गोलंदाजी केलेल्या 36 व्या षटकाच्या 5 वा चेंडू लॅब्युशेन खेळायला गेला, पण त्याचा शॉट चुकला आणि यष्टीरक्षक केएस भरतचे चपळाईने स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे लॅब्युशेन 49 धावांवर यष्टीचीत झाला.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मॅट रेनशॉ याला जडेजाने पायचीत पकडले. रेनशॉने रिव्ह्यू घेतला होता. मात्र, अंपायर्स कॉल आल्याने त्याला विकेट गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाला एकाच षटकात दुहेरी धक्के दिल्यानंतर जडजाने 42 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथला 37 धावांवर त्रिफळाचीत केले.

जडेजाने टाकलेल्या गोलंदाजीवर स्मिथने रक्षात्मक शॉट खेळण्याचा विचार केला होता. त्याने तसा प्रयत्नही केला. पण जडेजाने टाकलेल्या चेंडूने त्याचा बचाव भेदला आणि स्मिथ त्रिफळाचीत झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.

त्यानंतर जडेजाने 59 व्या षटकात टॉड मर्फीला शुन्यावर आणि 63 व्या षटकात पीटर हँड्सकॉम्बला 31 धावांवर पायचीत केले. यासह त्याने त्याच्या या डावातील 5 विकेट्सही पूर्ण केल्या.

Ravindra Jadeja
IND vs AUS: आनंद अन् अभिमान! लेकाचं कौतुक करण्यासाठी आई मैदानात, KS Bharat चा भावूक क्षण व्हायरल

दिग्गजांच्या यादीत सामील

जडेजाने कसोटी कारकिर्दीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही 11 वी वेळ आहे. याबरोबरच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. जडेजाच्या नावावर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 59 सामन्यांतील 66 डावात 104 विकेट्स नोंदवल्या गेल्या आहेत.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे (142), हरभजन सिंग (129), कपिल देव (124) आणि आर अश्विन (118*) यांनी असा कारनामा केला आहे. या यादीतील पाच जणांमध्ये सध्या केवळ अश्विन आणि जडेजा सध्या क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून सक्रिय आहेत.

पुनरागमनचा सामना

दरम्यान जडेजासाठी नागपूर कसोटी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाचा सामना आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो गेले पाच महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याने या कसोटी सामन्यापूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्राचे नेतृत्व करताना 8 विकेट्स घेतल्या होत्या.

याबरोबरच त्याने तो तंदुरुस्त असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्याने नागपूर कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम केले आहे. त्याने पुनरागमनाच्या पहिल्याच डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com