Ravindra Jadeja - R Ashwin PTI
क्रीडा

IND vs ENG: जड्डू-अश्विन फलंदाजांचे नवे कर्दनकाळ! कुंबळे-हरभजनला मागे टाकत ठरले भारताचे सर्वात यशस्वी गोलंदाज

Ravindra Jadeja - R Ashwin: इंग्लंडविरुद्ध हैदराबाद कसोटीत खेळताना रविंद्र जडेजा-आर अश्विन यांच्या जोडीने मोठा विक्रम नावावर केला आहे.

Pranali Kodre

Ravindra Jadeja and R Ashwin surpassed Anil Kumble Harbhajan Singh Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (25 जानेवारी) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या जोडीने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला.

दरम्यान, इंग्लंडकडून झॅक क्रावली आणि बेन डकेट यांनी सलामीला चांगली फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र त्यांची जोडी आर अश्विनने डकेटला 35 धावांवर पायचीत करत तोडली. त्यानंतर लगेचच 15 व्या षटकात रविंद्र जडेजाने ऑली पोपला 1 धावंवरच माघारी धाडले. त्याच्या पुढच्याच षटकात अश्विनने क्रावलीला 20 धावांवर बाद केले.

त्यामुळे जडेजा आणि अश्विन यांनी मिळून पहिल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडला 3 धक्के देण्याबरोबरच एकत्र 503 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

यामुळे आता जडेजा आणि अश्विन ही कसोटीमध्ये भारताकडून एकत्र सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाजांची जोडी ठरली आहे. त्यांनी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या जोडीचा विक्रम मोडला आहे.

कुंबळे आणि हरभजन यांनी 54 कसोटी सामने एकत्र खेळताना 501 विकेट्स मिळून घेतल्या आहेत. जडेजा आणि अश्विन यांनी 50 सामने एकत्र खेळताना 503 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 276 विकेट्स अश्विनने आणि 227 विकेट्स जडेजाने घेतल्या आहेत.

तथापि, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या जोड्यांच्या यादीत जडेजा आणि अश्विन 14 व्या क्रमांकावर आहेत. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडची वेगवान गोलंदाजांची जोडी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड आहे. त्यांनी 138 कसोटी सामने एकत्र खेळताना 1039 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंडने भारताविरुद्ध चालू असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत 28 षटकात 3 बाद 108 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या जोड्या

  • 1039 विकेट्स - जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड (138 सामने)

  • 1001 विकेट्स - शेन वॉर्न - ग्लेन मॅकग्रा (104 सामने)

  • 895 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन- चामिंडा वास (95 सामने)

  • 762 विकेट्स - कर्टली अँब्रोस - कर्टनी वॉल्श (95 सामने)

  • 667 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन - सनथ जयसूर्या (90 सामने)

  • 643 विकेट्स - मिचेल स्टार्क - नॅथन लायन (81 सामने)

  • 559 विकेट्स - वासिम आक्रम - वकार युनूस (61 सामने)

  • 547 विकेट्स - शेन पोलॉक - जॅक कॅलिस (93 सामने)

  • 541 विकेट्स - ट्रेंट बोल्ट - टीम साउदी (65 सामने)

  • 538 विकेट्स - मखाया एन्टीनी - जॅक कॅलिस (93 सामने)

  • 522 विकेट्स - डेल स्टेन - मॉर्ने मॉर्केल (62 सामने)

  • 517 विकेट्स - शेन वॉर्न - मार्क वॉ (103 सामने)

  • 506 विकेट्स - नॅथन लायन - जोश हेजलवूड (65 सामने)

  • 503 विकेट्स - रविंद्र जडेजा - आर अश्विन (50 सामने)*

  • 501 विकेट्स - हरभजन सिंग - अनिल कुंबळे (54 सामने)

(आकडेवारी 25 जानेवारी 2024 पर्यंत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT