IND vs ENG: सुरु होणार कसोटीचा थरार, भारत-इंग्लंड आमने-सामने उभे ठाकणार! कुठे अन् केव्हा पाहाणार मॅच, जाणून घ्या

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सामने कुठे आणि केव्हा पाहाणार जाणून घ्या.
Rohit Sharma - Ben Stokes
Rohit Sharma - Ben StokesPTI

India vs England Test Series:

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादला होणार असल्याने दोन्ही संघ सामन्याच्या काही दिवस आधीच हैदराबादला पोहोचले होते. तसेच हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांनी कसून सरावही केला आहे.

आता दोन्ही एक एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्यास सज्ज आहेत. दरम्यान, इंग्लंडचा संघ 12 वर्षांपूर्वीची पुनरागवृत्ती यंदाच्या दौऱ्यात करण्यासाठी उत्सुक आहे. 12 वर्षांपूर्वी 2012 साली इंग्लंडने भारताला भारतीय भूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले होते.

त्यानंतर मात्र एकदाही भारताने गेल्या 12 वर्षात कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कसोटी मालिकेत 12 वर्षे अपराजीत राहण्याचा विक्रम कायम करण्यासाठी उत्सुक असेल.

Rohit Sharma - Ben Stokes
IND vs ENG: टीम इंडियात विराटची जागा घेणार RCB चा 'हा' शिलेदार? इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी संघात सामील

दरम्यान 2021 च्या अखेरच्या भारतीय दौऱ्यात इंग्लंडला कसोटी मालिकेच 3-1 असा पराभव स्विकारावा लागला होता. तसेच या दोन संघात यापूर्वी अखेरची कसोटी मालिक इंग्लंडमध्ये 2021-22 मध्ये झाली होती. या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली होती.

आता पुन्हा एकदा हे दोन संघ आमने-सामने आहेत. दरम्यान, या दोन संघात होणारी कसोटी मालिका 11 मार्चपर्यंत चालणार आहे. या मालिकेतील सामने हैदराबाद, विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला या ठिकाणी होणार आहेत.

कुठे आणि केव्हा पाहाणार सामने?

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचही कसोटी सामन्यांतील प्रत्येक दिवसाचा खेळ हा सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. या मालिकेतील सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाता येणार आहे. तसेच या सामन्यांचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर होणार आहे.

Rohit Sharma - Ben Stokes
IND vs ENG: इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठी एकदिवस आधीच 'Playing-11' जाहीर! 'हे' खेळाडू भारताविरुद्ध उतरणार मैदानात

असे आहेत संघ -

  • भारतीय संघ (पहिल्या दोन कसोटीसाठी) - रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

  • इंग्लंड संघ - झॅक क्रावली, डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रुट, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन फोक्स, ऑली पोप, जेम्स अँडरसन, गट अटकिन्सन, शोएब बाशिर, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com