R. Ashwin & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

अश्विनच्या तक्रारीने विराटचे कर्णधारपद आले धोक्यात?

विराटची (Virat Kohli) तक्रार या खेळाडूने बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jai Shah) यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघांचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर (T-20 World Cup) मर्यादित षटकांच्या क्रीडा प्रकाराचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे टीम इंडियामध्ये सगळं काही अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले. याच दरम्यान इंग्लंडमध्ये (England) पार पडलेल्या आयसीसीच्या (ICC) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर टीम इंडियातील एका जेष्ठ खेळाडूने कर्णधार कोहलीची तक्रार बीसीसीआयकडे (BCCI) केली होती. विराटची तक्रार या खेळाडूने बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jai Shah) यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. मात्र तक्रार करणारा खेळाडू नेमका कोण आहे, याबाबत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता या तक्रार करणाऱ्या खेळाडूचे नाव समोर आले आहे.

दरम्यान, आयएएनएसने दिलेल्या एका वृत्तानुसार, विराट कोहलीची तक्रार बीसीसीआचे सचिव यांच्याकडे करणारा खेळाडू हा आर. अश्विन (R. Ashwin) असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. BCCI च्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ही बातमी देण्यात आली आहे. विराट कोहलीची तक्रार अश्विनने जय शहा यांच्याकडे केली होती आणि त्याच्यामुळे संघामध्ये सर्व अलबेल नसल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुध्द पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजय प्राप्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले नाही असा दावाही करण्यात आला होता. त्याचबरोबर केवळ अश्विननेच किवी फलंदाजावर काहीप्रमाणात अंकुश ठेवण्यात यशस्वी झाला होता, असेही यामध्ये म्हटले गेले होते.

शिवाय, आर. अश्विन आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद निर्माण झाला असल्याच्या वृत्ताला नुकत्याच इंग्लंडविरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियामधून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाला चांगलंच बळ मिळाले होते. इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या चारही कसोटीमध्ये टीम इंडियाचा हा अव्वल फिरकीपटू केवळ बेंचवर बसून राहीला होता. विराटने आर अश्विनला वगळत रविंद्र जडेजाला चारही कसोटी सामन्यामध्ये खेळवले होते. विशेष म्हणजे जडेजाची कामगिरी साधारण असतानाही अश्विनला एकाही कसोटीत अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान दिले नव्हते.

विराटची चहलसाठी फिल्डिंग

आगामी टी-ट्वेन्टी विश्वचषकसाठी आर. अश्विनची अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. सुमारे चार वर्षानंतर तो भारतीय संघांच्या टी-ट्वेन्टी संघात परतला आहे. मात्र विश्वचषकसाठी संघांची निवड करताना कर्णधार विराट कोहली याने फिरकीपटू यझुवेंद्र चहलसाठी फिल्डिंग लावली होती. संघात चहलला स्थान देण्यात यावे म्हणून त्याने निवड समितीसोबत वादही घातला होता, मात्र निवड समितीने आर. अश्विनची निवड केली. दुसरीकडे अश्विनची निवड करण्यामागे टीमटी- 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ

टी- 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशान किशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT