Mohammad Shami vs Ravi Shastri Dainik Gomantak
क्रीडा

Shami vs Shastri: मटण खाण्यावरून मोहम्मद शमीवर भडकले रवी शास्त्री; शमीने दिले 'असे' प्रत्युत्तर...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून

Akshay Nirmale

Ravi Shastri on Mohammad Shami: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने लक्षवेधी खेळ केला. त्याच शमीबाबत आता एक नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात मोहम्मद शमीबाबत एक रोचक खुलासा केला आहे. त्यांनी पुस्तकात सांगितले आहे की, एकदा टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजावर प्रशिक्षक रवी शास्त्री मटण आणि भात खाल्ल्याबद्दल चिडले होते. त्यावरून त्यांनी शमीला फटकारलेही होते.

श्रीधर यांनी त्यांच्या Coaching Beyond या पुस्तकात लिहिले आहे की, भारतीय संघ 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. या मालिकेत टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते.

अशा परिस्थितीत क्लीन स्वीप टाळण्यासाठी टीम इंडियाला तिसरा सामना कोणत्याही प्रकारे जिंकायचा होता. तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला 241 धावांचा बचाव करावा लागला.

डाव संपल्यानंतर भारतीय संघ ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा तेथील वातावरण खूपच खराब झाले होते. दक्षिण आफ्रिकेला कसे हरवायचे यावरच सर्वजण चर्चा करत होते. त्याचवेळी शमीला खूप भूक लागली होती. त्याने डिशमध्ये मटण आणि भात घेऊन जेवायला सुरूवात केली.

शमीचे हे कृत्य रवी शास्त्रींना आवडले नाही. त्यांनी सर्वांसमोर शमीला खडसावले. सगळी भूक जेवणानेच मिटवणार की काही विकेटही घेणार? असे शास्त्री शमीला चिडून बोलले.

रवी शास्त्रींनी अशा पद्धतीने फटकारल्यानंतर मोहम्मद शमी जेव्हा पुन्हा मैदानावर उतरला तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. शमीने भारतीय संघाच्या 241 धावांचा बचाव करताना 28 धावांत 5 बळी घेतले. भारताने हा कसोटी सामना 63 धावांनी जिंकला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार विजयाची नोंद केली होती. मोहम्मद शमीदेखील दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT