Trent Boult
Trent Boult  Dainik Gomantak
क्रीडा

Trent Boult Catch Video: पहिली ओव्हर अन् बोल्टची विकेट... स्वत:च्याच बॉलिंगवर घेतला भन्नाट कॅच

Pranali Kodre

Trent Boult Catch Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी 66 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने स्वत:च्याच गोलंदाजीवर नेत्रदिपक झेल घेतला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. त्यानुसार त्याने पहिल्याच षटकात गोलंदाजीसाठी ट्रेंट बोल्टकडे चेंडू सोपवला.

त्यानेही कर्णधाराचा विश्वास खरा ठरवताना दुसऱ्याच चेंडूवर बोल्टने पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला झेलबाद केले. झाले असे की बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरनने जोरदार शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता.

पण त्याचवेळी बोल्टने चपळाई दाखवली आणि त्याने उजवीकडे सूर मारत शानदार झेल घेतला. त्यामुळे प्रभसिमरनला २ धावांवरच माघारी जावे लागले.

दरम्यान, बोल्टने स्वत:च्याच चेंडूवर झेल घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशी कामगिरी केली आहे. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेत बोल्टने 10 वेळा डावाच्या पहिल्या षटकात गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 46 धावा दिल्या, तसेच 43 निर्धाव चेंडू टाकले आहेत. याशिवाय त्याने 7 विकेट्सही घेतल्या आहेत.

पण, या सामन्यात बोल्टने पहिल्याच षटकात 1 विकेट घेतली असली, तरी अखेरच्या षटकात मात्र त्याच्याविरुद्ध शाहरुख खानने तब्बल 18 धावा चोपल्या. त्यामुळे बोल्टने या सामन्यात पहिल्या तीन षटकात चांगली गोलंदाजी केल्यानंतरही त्याची इकोनॉमी 8 च्या पुढे गेली. त्याने 4 षटकात 35 धावा खर्च करत 1 विकेट घेतली.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक 49 धावांची नाबाद खेळी केली. तसेच जितेश शर्माने 44 धावांची आणि शाहरुख खानने 41 धावांची नाबाद खेळी केली. राजस्थानकडून बोल्ट व्यतिरिक्त नवदीप सैनीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ऍडम झम्पाने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT