Raynier Fernandes | FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa: रेनियर फर्नांडीसमुळे एफसी गोवा संघाला बळकटी; मध्यफळीत मिळाला अनुभवी खेळाडू

किशोर पेटकर

Raynier Fernandes in FC Goa: एफसी गोवाने संघाच्या मध्यफळीस बळकटी देताना अनुभवी रेनियर फर्नांडिस (Raynier Fernandes) याला दीर्घ काळासाठी करारबद्ध केले. या 27 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या अनुभवास प्राधान्य देण्यात आले.

गतमोसमात (2022-23) सुपर कप जिंकलेल्या ओडिशा एफसी संघातून मुंबईतील हा खेळाडू गोव्यातील संघात दाखल झाला आहे. रेनियर यापूर्वी मुंबई सिटीतर्फे खेळताना यशस्वी ठरला आहे. या संघातर्फे त्याने आयएसएल करंडक व लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता.

एफसी गोवाने नव्या मोसमापूर्वी रेनियरसह रॉलिन बोर्जिस, संदेश झिंगन, उदांता सिंग व बोरिस सिंग असे पाच नवे भारतीय फुटबॉलपटू करारबद्ध केले असून बोरिसचा अपवाद वगळता इतर चौघेही राष्ट्रीय सीनियर संघाचे सदस्य आहेत.

एफसी गोवाचे शैली भावते

एफसी गोवा संघाशी करार केल्यानंतर रेनियरनने सांगितले, की ‘‘मला मैदानावर भावना व्यक्त करणे आवडते आणि त्याबाबत एफसी गोवाची शैली, त्यांचे तत्त्वज्ञान पाहता, मला सर्वाधिक संधी आहे. कारकिर्दीत काही उत्कृष्ट संघांतर्फे खेळण्याइतपत मी भाग्यवान ठरलो, मात्र एफसी गोवातर्फे आणखीन उंची गाठण्याचा विश्वास वाटतो.

यशस्वी कामगिरीसंदर्भात या क्लबच्या योजना माझ्याशी जुळतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे मी आकर्षित झालो.’’

मुख्य प्रशिक्षक मानोला मार्केझ व संघासमवेत काम करण्यासाठी, तसेच या संघाच्या कट्टर पाठिराख्यांसमोर गोव्यात खेळण्यासाठी आपण उत्साहित असल्याचे त्याने नमूद केले.

मध्यफळीत स्थिरता येण्याचा विश्वास

रेनियरमुळे एफसी गोवाच्या मध्यफळीत स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त करताना या संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर म्हणाले, की ‘‘रेनियर हा असाधारण गुणवत्तेचा खेळाडू असून, त्याचे तांत्रिक कौशल्य, खेळाबाबतचा अभ्यास उल्लेखनीय आहे.

खेळातील त्याची सर्जनशीलता, पासिंगबाबतचा दृष्टिकोन आणि जागा हेरून लढवलेले डावपेच यामुळे निश्चितपणे आमच्या संघाच्या मध्यफळीत नवा आयाम जोडला जाईल.’’

रेनियरची व्यावसायिकता, समर्पितवृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन संघासाठी प्रेरणा आणि एकसंधतेत योगदान देईल, असेही पुस्कूर यांनी स्पष्ट केले.

दृष्टिक्षेपात रेनियर फर्नांडिस

  • एअर इंडिया एफसीतर्फे व्यावसायिक कारकीर्द सुरू

  • 2016-17 मध्ये मोहन बागानशी करार, या संघातर्फे एएफसी कप प्रतिनिधित्व

  • 2019 मध्ये भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण. त्या लढतीत थायलंडवर १-० अशी मात

  • 2018-19 मध्ये आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीतर्फे पदार्पण

  • मुंबई सिटीतर्फे 2020-21 मध्ये आयएसएल करंडक, लीग विनर्स शिल्ड विजेता, एएफसी चँपियन्स लीगमध्येही संधी

  • 2022-23 मध्ये ‘लोन’वर ओडिशा एफसी संघात, सुपर कपचा मानकरी

  • एकंदरीत आयएसएल स्पर्धेत 90 सामने, 3 गोल, 7 असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT