Special Olympics World Games 2023: भारताने 202 पदके जिंकत रचला इतिहास, पीएम मोदींनी केले अभिनंदन

Special Olympics World Games 2023: स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स 2023 आता संपले आहेत. भारताचा प्रवास 202 पदकांसह संपला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Special Olympics World Games 2023: स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स 2023 आता संपले आहे. भारताचा प्रवास 202 पदकांसह संपला. भारताने शेवटच्या दिवशी दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके जिंकली. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट केले की, "बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक समर गेममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतुलनीय खेळाडूंचे अभिनंदन, ज्यांनी 76 सुवर्णांसह 202 पदके जिंकली. त्यांचे यश वाखणण्याजोगे आहे. पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंचे अभिनंदन...''

PM Narendra Modi
2023 Special Olympics Summer Games : जिगरबाज तानियाने जिंकले रौप्य

दुसरीकडे, भारताने (India) एकूण 202 पदके जिंकली आहेत. यामध्ये 76 सुवर्ण, 75 रौप्य आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंनी ट्रॅक इव्हेंटमध्ये सहा पदके (2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य) जिंकली आहेत.

PM Narendra Modi
World Cup Qualifiers 2023: वेस्ट इंडिज वर्ल्डकप 2023 मधून होणार बाहेर? माजी विश्वविजेत्यांसमोर असे आहे समीकरण

स्पेशल ऑलिम्पिक जागतिक गेम काय आहे

स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स बौद्धिक विकलांग सहभागींसाठी व्यासपीठ प्रदान करते. त्याचबरोबर, जागतिक स्तरावर बौद्धिक विकलांग लोकांना त्यांची कौशल्ये दाखवण्याची संधी देणे हे त्याचे उद्धिष्ट आहे. दर दोन वर्षांनी या गेमचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये समर आणि विंटर या दोन्हींचा समावेश होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com