Ashes 2023, Nathan Lyon consecutive 100th Tests: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (28 जून) लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सुरू झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनसाठी खूप स्पेशल आहे.
लायनचा हा कारकिर्दीतील 122 वा कसोटी सामना खेळत आहे. पण असे असले तरी हा त्याला सलग 100 वा कसोटी सामना आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या गेल्या सर्व १०० सामन्यात तो खेळला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सलग 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो सहावाच खेळाडू ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकच्या नावावर आहे. त्याने 2006 ते 2018 दरम्यान इंग्लंडसाठी सलग 159 सामने खेळले. तसेच दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे ऍलन बॉर्डर असून त्यांनी 153 सामने सलग खेळले, तर तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉ यांनी 107 सामने सलग खेळले आहेत.
चौथ्या क्रमांकावर भारताचे सुनील गावसकर असून त्यांनी 106 कसोटी सामने सलग खेळले आहेत. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्युलम आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार मॅक्युलमची विशेषत:अशी की त्याने त्याच्या कारकिर्दीत 101 कसोटी सामने खेळले असून हे सर्व 101 सामने त्याने सलग खेळले आहेत. तो कोणत्याही कारणाने एकाही कसोटी सामन्याला मुकला नाही.
159 सामने - ऍलिस्टर कूक (2006 - 2018)
153 सामने - ऍलेन बॉर्डर (1979-1994)
107 सामने - मार्क वॉ (1993-2002)
106 सामने - सुनील गावसकर (1975 - 1987)
101 सामने - ब्रेंडन मॅक्युलम (2004-2016)
100 सामने - नॅथन लायन (2013-2023)*
लायन अखेरच्या वेळी 2013 मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्यानंतर 1 ऑगस्ट 2013 पासून तो ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकाही सामन्याला मुकला नाही.
दरम्यान, त्याच्या या सलग 100 व्या सामन्यात त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. त्याने जर 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतले, तर तो कसोटीत 500 विकेट्स पूर्ण करेल. तसेच कसोटीत 500 विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.