शेतकऱ्याच्या या मुलाने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. dainik gomantak
क्रीडा

Indian men's hockey team: वडिलांनी गाय विकून घडविले,आता बनलाय भारताची भिंत

टोकियोमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.लहानपणापासूनच ॲथलेटिक्समध्ये रस होता. परंतु आमच्या गावात हॉकीची फारशी सोय नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला तिरुअनंतपुरम येथील जी.व्ही.राजा स्पोर्टस् स्कूलमध्ये घातले.

दैनिक गोमन्तक

एर्नाकुलम जिल्ह्यातील एरुमेलीमधील पी.व्ही. रवींद्रन (P.V. Rabindran) या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याचे कारण म्हणजे रवींद्रन यांचा मुलगा आणि त्याने भारतासाठी केलेली उकृष्ट कामगिरी हे आहे.

भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक (Goalkeeper of the Indian hockey team) आणि भारताचा माजी कर्णधार श्रीजेश.पी.आर (Sreejesh.P.R) याने टोकियो ऑलिंपिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळे भारताने थेट उपांत्य सामन्यात धडक मारली. शेतकऱ्याच्या या मुलाने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत श्रीजेशच्या कुटुंबियाशी बोलले असता त्याचे वडिल रवीद्रंन म्हणाले, टोकियोमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. त्यात खारीचा वाटा श्रीजेशचा असल्याने आमचा आनंद व्दिगुणीत झाला आहे. श्रीजेशच्या उकृष्ट कामगिरीमुळे फक्त आम्हालाच नाही, तर देशातील सर्वांनाच आनंद झाला आहे. पुढील सामन्यासाठी आमच्याकडून भारतीय संघाला शुभेच्छा देतो.

ते म्हणाले, श्रीजेशला लहानपणापासूनच ॲथलेटिक्समध्ये रस होता. परंतु आमच्या गावात हॉकीची फारशी सोय नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला तिरुअनंतपुरम येथील जी.व्ही.राजा स्पोर्टस् स्कूलमध्ये घातले. आठवीमध्ये असताना श्रीजेशने हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आम्ही व्यावसायाने शेतकरी असल्याने श्रीजेशला गोलकिपिंगसाठी लागणारे किट घेणे सुध्दा आम्हाला शक्य होत नव्हते. कारण त्या किटची किंमत 10 हजार रुपये होती. कसेतरी आम्ही पैसे जमविले त्यामध्ये आम्ही आमची दुभती गाय (cow) देखील विकली आणि श्रीजेशसाठी गोलकिपिंगचे किट (Goalkeeping kits) विकत घेतले. श्रीजेशने त्याच्या खेळावर इतकी मेहनत आणि आज आम्हाला इथवर आणले आहे. माझा मुलगा म्हणून माला आज त्याचा अभिमान वाटत आहे.

या विषयी बोलताना श्रीजेशची पत्नी म्हणाली, टोकियो ऑलिंपिकमध्ये हॉकीमधून भारताला पदकाची आशा आहे. श्रीजेश माझा वर्गमित्र होता. कोणताही सामना असला तरी तो तेवढाच गंभीर्याने खेळतो. त्याने हॉकीसाठी स्वत: समर्पीत केले आहे. खेळात प्रत्येक स्तरावर तो प्रत्येक वेळी आपले 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT