Tokyo Olympics: भारताने जगजेत्ता ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Tokyo Olympics: भारताने जगजेत्ता ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
Tokyo Olympics: Indian women hockey team during game against Australia
Tokyo Olympics: Indian women hockey team during game against AustraliaTwitter
Published on
Updated on

भारताने जगजेत्ता ऑस्ट्रेलियाला (India vs Australia hockey) चारली धूळ. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १-० ने हरवले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय महिला हॉकी संघानं (Indian women hockey team) अटीतटीच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (Australia) हरवून पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश करत इतिहास घडवला आहे . भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली. ग्रुप स्टेज मध्ये भारताची खडतर सुरवात झाली मात्र उत्कृष्ट खेळ करत भारताच्या महिलांनी हम भी किसी से कम नही हे सिद्ध करून दाखवलं.

२२ मिनिट झाले असतानाच गुरजीत कौर ने भारताला १-० ने आघाडी दिली. शेवटच्या मिनिटापर्यंत ऑस्ट्रेलियाने आक्रमकता जपली होती मात्र भारताच्या गोलरक्षक सविता पुनिया हिने उत्तम खेळ करत त्यांचे मनसुभे हाणून पाडले. भारताच्या या विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

पुरुष संघ उपांत्य फेरीत

दुसऱ्या बाजूला पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. रविवारी ग्रेट ब्रिटनला 3-1 धुळीत मिळवत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुष हॉकी संघाने ४० वर्षानंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. भारताकडून दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला, गुरजंत सिंगने 16 व्या तर हार्दिक सिंहने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ब्रिटनकडून सॅम्युएल वार्डने 45 व्या मिनिटाला एकमेव गोल करून दिला. उपांत्य फेरीत भारताचा सामना विश्वविजेत्या बेल्जियमशी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com