Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीम फायनलमधून बाहेर,पेनल्टी स्ट्रोकेने केला घात

आज झालेल्या सेमी फायनल सामन्यामध्ये बेल्जीयमने भारताचा 5-2 असा पराभव केला आहे.
Indian men's hockey team loses to Belgium 5-2 in the semi-final
Indian men's hockey team loses to Belgium 5-2 in the semi-finalDainik Gomantak
Published on
Updated on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज झालेल्या हॉकीच्या(Hockey) सेमी फायनल मध्ये बेल्जीयमने भारतचा (INDvsBEL) पराभव केला आहे.या सामन्यामध्ये बेल्जीयमने भारताचा 5-2 असा पराभव केला आहे. आणि याही वर्षीचे भारताचे फायनल मध्ये जाण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. (Indian men's hockey team loses to Belgium 5-2 in the semi-final)

अलेक्झांडर हेंड्रिक्सच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर, गतविजेत्या बेल्जियमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या गेलेल्या पुरुष हॉकीच्या उपांत्य सामन्यात भारताचा 5-2 असा पराभव केला आहे. ओई हॉकी स्टेडियमच्या उत्तर बाजूला असलेल्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, भारत एकेकाळी 2-1 ने आघाडीवर होता पण त्यानंतर तो खूपच मागे गेला चार क्वार्टरमध्ये बेल्जियमला तब्बल 13 पॅनेल्टी शूट आऊट मिळाले आणि अखेरीस 1980 नंतरच्या पहिल्या फायनलला सुद्धा भारत मुकला आहे .

भारतीय पुरुष हॉकी संघा अजूनही पदाकापासून दूर आहे.मात्र सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलं असले तरिही पदक अद्यापही दृष्टीक्षेपात आहे.कारण, ऑस्‍ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघासोबत कांस्य पदकासाठी भारतीय संघ दोन हात करणार आहे.भारतासोबत हा सामना कोण खेळणार, हे जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यानंतर निश्चित होईल.

Indian men's hockey team loses to Belgium 5-2 in the semi-final
India Vs England: भारतीय संघाची ओपनिंगची समस्या अजुन वाढली

आजच्या सामन्याचा पहिला गोल बेल्जियमने केला. लोइक फॅनी लुपर्टने दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. दुसरा सामना सुरू होईपर्यंत भारत मागे होता. भारतीय संघ दडपणाखाली होता. पण या दबावातून बाहेर आल्यानंतर हरमनप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला गोल करून सामन्यात उत्साह आणला. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. आणि दोन्ही देश 1-1 ने बरोबरीला आले.

परत दोन्ही देशांनी 1-1 गोल करून सामना 2 - 2 असा बरोबर केला होता खरा मात्र शेवटच्या क्षणी भारताच्या संरक्षण रेषेत भंग झाला. बेल्जियमला ​​सतत पेनल्टी कॉर्नर मिळत होते. याच क्रमाने त्याने 53 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक केला, ज्यावर हेंड्रिक्सने गोल करून आपल्या संघाचा 4-2 असा विजय निश्चित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com