Rachin Ravindra
Rachin Ravindra PTI
क्रीडा

ICC Awards: रचिन रविंद्रने 'या' पुरस्कारावर कोरलं नाव, भारताच्या जयस्वालसह कोएत्झी, मदुशंकाला टाकलं मागे

Pranali Kodre

Rachin Ravindra Won ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) 2023 मधील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने 2023 वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध विभागातील पुरस्कारांसाठी नामांकित केले होते.

आता आयसीसी या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करत असून बुधवारी (24 जानेवारी) 2023 वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कार विजेत्यांचे नाव जाहीर केले आहे. पुरुषांमध्ये हा पुरस्कार न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्रने जिंकला आहे, तर महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डने हा पुरस्कार जिंकला.

रचिनने जिंकला आयसीसीचा पुरस्कार

रचिनने हा पुरस्कार जिंकताना दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्झी, श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका आणि भारताच्या यशस्वी जयस्वाल यांना मागे टाकले आहे. या तिघांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या तिन्ही युवा खेळाडूंनीही 2023 मध्ये शानदार कामगिरी केली होती.

24 वर्षीय रचिन रविंद्रसाठी 2023 वर्ष शानदार राहिले आहे. त्याने 2023 मध्येच वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणही केले. तसेच त्याने भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

आयसीसीचा सर्वोत्तम उदयोन्मुख पुरस्कार स्विकारल्यानंतर रचिन रविंद्र म्हणाला, 'ही नक्कीच शानदार भावना आहे. तुमच्या कामगिरीची आयसीसीकडून दखल घेतली जावी ही नक्की खास भावना आहे. गेले वर्ष वादळी होते. मला वेगवेगळ्या वातावरणात खूप क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, जे शानदार होते.'

रचिनने 2023 वर्षात वनडेत 41 च्या सरासरीने 3 शतके आणि 3 अर्धशतकांसह 25 सामन्यांत 820 धावा केल्या आणि त्याने 18 विकेट्सही घेतल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 12 सामने खेळले त्यात त्याने 91 धावा केल्या, तर 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या जयस्वालने 2023 वर्षात 39 च्या सरासरीने 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 718 धावा केल्या.तसेच कोएत्झीने 2023 मध्ये 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 23.51 च्या सरासरीने 47 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 2023 वर्षात मदुशंकाने 27.59 च्या सरासरीने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या.

फोबी लिचफिल्डनेही जिंकला पुरस्कार

महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डने 2023 मधील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकाल आहे. तिने बांगलादेशच्या मारुफा अख्तर, इंग्लंडच्या लॉरेन बेल आणि स्कॉटलंडच्या डार्सी कार्टर यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.

20 वर्षीय फोबीने 2023 वर्षात कसोटी आणि वनडेत पदार्पण केले. तिने वनडेत 14 सामने खेळताना 2 शतकांसह 604 धावा केल्या. तसेच 2 कसोटीत 87 धावा केल्या. तिने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3 सामन्यांत 88 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT