BCCI Awards: टीम इंडियाचा 'प्रिन्स' सर्वोत्तम क्रिकेटर, तर इंजिनीयर, शास्त्रींना जीवनगौरव; पाहा विजेत्यांची यादी

BCCI Awards: मंगळवारी बीसीसीआयने गेल्या चार वर्षातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार सोहळा हैदराबादमध्ये पार पडला.
Team India
Team IndiaX/BCCI

BCCI Awards in Hyderabad:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) पुरस्कार सोहळा मंगळवारी (२३ जानेवारी) हैदराबादमध्ये पार पडला. बीसीसीआयचा हा पुरस्कार सोहळा तब्बल ४ वर्षांनंतर पार पडला. गेल्या चार वर्षात कोविडच्या कारणाने हा सोहळा झाला नव्हता.

यापूर्वी अखेरीस २०१८-१९ हंगामासाठी हा सोहळा झाला होता. त्यामुळे गेल्या चार वर्षातील पुरस्कार मंगळवारी देण्यात आले. या सोहळ्यासाठी भारत दौऱ्यावर आलेला इंग्लंडचा संघही उपस्थित होता. तसेच भारतीय महिला संघातील खेळाडूही या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

याशिवाय भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री, अनिल कुंबळे, मिताली राज, झुलन गोस्वामी हे देखील सोहळ्यात उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजूमदार आणि पुरुष संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडनेही या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.

या पुरस्कार सोहळ्यात माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना कर्नल सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

Team India
National Sports Awards: सात्विक-चिरागला खेलरत्न, तर शमी-ओजससह 26 जणांना अर्जुन, राष्ट्रपती भवनात रंगला पुरस्कार सोहळा

दरम्यान, २०२२-२३ या हंगामासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार सध्या प्रिन्स म्हणून टोपननाव मिळालेल्या शुभमन गिलने पटकावला. त्याने २०२३ वर्षात ४६ च्या सरासरीने २१५४ धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात ७ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत.

तसेच दिप्ती शर्माला २०२२-२३ या हंगामासाठी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. दिप्तीने २०२३ वर्षात २ कसोटीत १६५ धावा केल्या आणि ११ विकेट्स घेतल्या.

तसेच २०२३ वर्षात तिने वनडेत ५ सामन्यांत ६६ धावा आणि ८ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटममध्ये तिने २०२३ वर्षात १९ सामन्यांत १०६ धावा केल्या आणि २१ विकेट्स घेतल्या आहेत.

बीसीसीआय पुरस्कार

जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्तम महिला ज्यूनियर क्रिकेटपटू)

  • २०१९-२० काशवी गौतम (चंदीगढ)

  • २०२१-२२ सौम्य तिवारी (मध्य प्रदेश)

  • २०२२-२३ वैष्णवी शर्मा (मध्य प्रदेश)

जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्तम महिला सिनियर क्रिकेटपटू)

  • २०१९-२० सई पुरंदरे (मेघालया)

  • २०२१-२२ इंद्राणी रॉय (झारखंड)

  • २०२१-२२ कनिका अहुजा (पंजाब)

  • २०२२-२३ नबम यापू (अरुणाचल प्रदेश)

जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स)

  • २०१९-२० - निर्देश बेसॉय (मेघालय)

  • २०२२-२३ - अनमोलजीत सिंग (पंजाब)

जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक धावा)

  • २०१९-२० उदय सहारन (पंजाब)

  • २०२२-२३ विगान मल्होत्रा (पंजाब)

एमए चिदंबरम ट्रॉफी (U19 कुच बिहार ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स)

  • २०१९-२० - हर्ष दुबे (विदर्भ)

  • २०२१-२२ - एआर निषाद (महाराष्ट्र)

  • २०२२ -२३ - मनन चोठाणी (सौराष्ट्र)

एमए चिदंबरम ट्रॉफी (U19 कुच बिहार ट्रॉफी सर्वाधिक धावा)

  • २०१९-२० प्रज्ञेश कनपिल्लेवार (मुंबई)

  • २०२१-२२ मयंक शांडिल्य (हरियाणा)

  • २०२२-२३ धनिश मलेवार (विदर्भ)

एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स)

  • २०१९-२० अंकुश त्यागी (मध्यप्रदेश )

  • २०२१-२२ हर्ष दुबे (विदर्भ)

  • २०२२-२३ विशाल जयस्वाल (गुजरात)

एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक धावा)

  • २०१९-२० - पार्थ पलावत (सिक्कीम)

  • २०२१-२२ - वाय.व्ही राठोड (विदर्भ)

  • २०२२-२३ - क्षितीज पटेल (गुजरात)

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स)

  • २०१९-२० जयदेव उवाडकट (सौराष्ट्र)

  • २०२१-२२ शम्स मुलानी (मुंबई)

  • २०२२-२३ जलज सक्सेना (केरळ)

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा)

  • २०१९-२० राहुल दलाल (अरुणाचल प्रदेश)

  • २०२१-२२ सरफराज खान (मुंबई)

  • २०२२-२३ मयंक अगरवाल (कर्नाटक)

लाला अमरनाथ पुरस्कार (मर्यादीत षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू)

  • २०१९-२० बाबा अपराजीत (तमिळनाडू)

  • २०२०-२१ ऋषी धवन (हिमाचल प्रदेश)

  • २०२१-२२ ऋषी धवन (हिमाचल प्रदेश)

  • २०२२-२३ रियान पराग (अरुणाचल प्रदेश)

लाला अमरनाथ पुरस्कार (रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम अष्टपैलू)

  • २०१९-२० एमबी मुरासिंग (त्रिपूरा)

  • २०२१-२२ शम्स मुलानी (मुंबई)

  • २०२२-२३ सारांश जैन (मध्यप्रदेश)

बीसीसीआय स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी

  • २०१९-२० - मुंबई संघ

  • २०२१-२२ - मध्यप्रदेश संघ

  • २०२२-२३ - सौराष्ट्र संघ

सर्वोत्तम पंच

  • २०१९-२० केएन अनंतपद्मनाभन

  • २०२०-२१ वृंदा राठी

  • २०२१-२२ जयरामन मदनगोपाल

  • २०२२-२३ रोहन पंडित

आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक विकेट्स (महिला)

  • २०१९-२० पुनम यादव

  • २०२०-२१ झुलन गोस्वामी

  • २०२१-२२ राजेश्वरी गायकवाड

  • २०२२-२३ देविता वैद्य

आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक धावा (महिला)

  • २०१९ -२० पुनम राऊत

  • २०२०-२१ मिताली राज

  • २०२१-२२ हरमनप्रीत कौर

  • २०२२-२३ जेमिमाह रोड्रिग्स

दिलीप सरदेसाई पुरस्कार (सर्वाधिक कसोटी विकेट्स विरुद्ध वेस्ट इंडिज)

  • २०२२-२३ आर अश्विन

दिलीप सरदेसाई पुरस्कार (सर्वाधिक कसोटी धावा विरुद्ध वेस्ट इंडिज)

  • २०२२-२३ यशस्वी जयस्वाल

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला

  • २०१९-२० प्रिया पुनिया

  • २०२०-२१ शफली वर्मा

  • २०२१-२२ शब्बीनेनी मेघना

  • २०२२-२३ अमनज्योत कौर

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष

  • २०१९-२० मयंक अगरवाल

  • २०२०-२१ अक्षर पटेल

  • २०२१-२२ श्रेयस अय्यर

  • २०२२-२३ यशस्वी जयस्वाल

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

  • २०१९-२० दिप्ती शर्मा

  • २०२०-२१ स्मृती मानधना

  • २०२१-२२ स्मृती मानधना

  • २०२२-२३ दिप्ती शर्मा

पॉली उम्रीगर ट्रॉफी (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू)

  • २०१९-२० मोहम्मद शमी

  • २०२०-२१ आर अश्विन

  • २०२१-२२ जसप्रीत बुमराह

  • २०२२-२३ शुभमन गिल

सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार

  • फारुख इंजिनियर

  • रवी शास्त्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com