ICC Awards: पुन्हा एकदा सूर्याच दादा! सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम T20I क्रिकेटर पुरस्कारावर मोहोर

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्यांदा आयसीसीच्या सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटू पुरस्कार जिंकला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavX/BCCI
Published on
Updated on

India Batter Suryakumar Yadav won ICC Men’s T20I Cricket of the Year award 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसांपूर्वीच 2023 मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध विभागात नामांकन दिले होते. आता आयसीसीने बुधवारी 2023 मधील सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूची घोषणा केली आहे.

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्यांदा आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. त्याला 2022 मधील देखील सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.

सूर्यकुमारने 2023 मधील सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावताना झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (11 डावात 515 धावा, 17 विकेट), युगांडाचा अल्पेश रामजानी (55 विकेट) आणि न्यूझीलंडचा मार्क चॅपमन (17 डावात 556 धावा) यांना मागे टाकले आहे. या तिघांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

Suryakumar Yadav
ICC 2023 कसोटी संघात तब्बल 5 ऑसी क्रिकेटरला स्थान; भारताच्या फिरकी जोडीची निवड

सुर्यकुमारने सलग दुसऱ्यांदा जिंकला पुरस्कार

सूर्यकुमारची 2023 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी झाली आहे. त्याने त्याने 2023 वर्षात 18 टी20 सामने खेळताना जवळपास 48 च्या सरासरी 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 733 धावा केल्या.

तो गेल्या अनेक महिन्यांपासून आयसीसीच्या टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 2023 वर्षात काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे.

Suryakumar Yadav
ICC Awards 2023: सर्वोत्तम क्रिकेटरसाठी कोहली-जडेजाची वर्ल्डकप फायनलमध्ये नडणाऱ्या दोन ऑस्ट्रेलियन्सशी टक्कर

विशेष म्हणजे सूर्यकुमारला 2023 मधील आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष टी20 संघातही चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. इतकेच नाही, तर या संघाचा कर्णधार म्हणूनही त्याची आयसीसीने निवड केली आहे. एकूणच त्याच्या 2023 मधील कामगिरीमुळे त्याला दुसऱ्यांदा आयसीसीचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकण्यात यश मिळाले आहे.

सूर्यकुमारने 2022 वर्षातही सर्वाधिक टी20 धावा केल्या होत्या. त्याने 2022 मध्ये 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com