R Ashwin Records: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC अंतिम सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे.
दरम्यान, भारताचा स्टार ऑफस्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचणार आहे. या सुपर रेकॉर्डमुळे रविचंद्रन अश्विन जागतिक क्रिकेटमध्ये दहशत निर्माण करेल.
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनलमध्ये 3 विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट पूर्ण करेल.
आतापर्यंत फक्त अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनाच भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी मिळवता आले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी घेणारा रविचंद्रन अश्विन हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरणार आहे. सध्या, रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 697 बळी घेण्याचा विक्रम आहे.
जर अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या फायनलमध्ये 3 विकेट घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स पूर्ण करेल.
अनिल कुंबळेने (Anil Kumble) भारताकडून सर्वाधिक 956 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे, ज्याने 711 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.
1. अनिल कुंबळे - 956 विकेट्स
2. हरभजन सिंग - 711 विकेट्स
3. रविचंद्रन अश्विन - 697 विकेट्स
4. कपिल देव - 687 विकेट्स
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 कसोटी विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 कसोटी विकेट्स
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 685 कसोटी विकेट्स
4. अनिल कुंबळे (भारत) - 619 कसोटी विकेट्स
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 581 कसोटी विकेट्स
6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 कसोटी विकेट्स
7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 कसोटी विकेट्स
8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 482 कसोटी विकेट्स
9. रविचंद्रन अश्विन (भारत) - 474 कसोटी विकेट्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.