WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून भारत एक महा रेकॉर्ड करेल. विशेष म्हणजे, असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला देश बनेल. भारताने 10 वर्षांपूर्वी शेवटच्या वेळी आयसीसीचे विजेतेपद जिंकले होते.
2013 मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. यावेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) 2013 पासूनचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून भारत (India) एक मोठा रेकॉर्ड करेल. कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. जगातील कोणत्याही संघाला आतापर्यंत ही महान कामगिरी करता आलेली नाही.
मात्र, भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने एकमेव T20 वर्ल्ड कप जिंकला होता. आता भारताला रेड बॉल क्रिकेटमध्येही विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
तसेच, 7 जूनपासून ओव्हलच्या मैदानावर सुरु होणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला जाईल.
तसे पाहता ऑस्ट्रेलियालाही इतिहास रचण्याची संधी असेल. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.
दुसरीकडे, 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकमेव T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकणारा तो जगातील पहिला देश बनेल.
सध्याच्या ICC कसोटी क्रमवारीत, भारत जगातील क्रमांक 1 चा संघ आहे. ऑस्ट्रेलिया जगातील क्रमांक 2 चा संघ आहे. जगातील हे दोन बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांशी भिडतील, तेव्हा क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल.
1. 1983 - भारताने एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला (कर्णधार - कपिल देव)
2. 2007 - भारताने T20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला (कर्णधार - महेंद्रसिंग धोनी)
3. 2011 - भारताने एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला (कर्णधार - महेंद्रसिंग धोनी)
4. 2023 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप) - ???? (कर्णधार - रोहित शर्मा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.