R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

R Ashwin: 'पुजारा, विराट अन् रहाणे अभेद्यच, कुटुंबानंतर त्यांचेच आभार...', अश्विनला का आली जुन्या सहकाऱ्यांची आठवण?

R Ashwin 100th Test: धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या आर अश्विनने पुजारा, विराट आणि रहाणेची आठवण काढून त्यांचेही आभार मानले आहेत.

Pranali Kodre

R Ashwin Thanked Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara, Virat Kohli and Rohit Sharma

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे गुरुवारपासून (7 मार्च) सुरू झाला आहे. हा सामना भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनसाठी खास आहे. हा त्याचा 100 वा कसोटी सामना आहे.

दरम्यान, या सामन्यानिमित्त बोलताना त्याने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या योगदानाबद्दल त्यांचेही आभार मानले.

अश्विनने त्याच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल पकडून त्याला अनेक विकेट मिळवून दिल्याबद्दल या खेळाडूंचे कौतुक केले आहे.

अश्विन क्रिकेट मंथलीबरोबर बोलताना म्हणाला, 'मला म्हणायचे आहे की मी भाग्यशाली आहे की अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे स्लिप आणि लेग स्लिपला क्षेत्ररक्षणाला होते. माझ्यासाठी नेहमीच विराट कोहली शॉर्ट मिडविकेटला असायचा, पुजारा लेग स्लिपला आणि अजिंक्य रहाणे स्लीपला. ते अभेद्य होते.'

'मी जर माझ्या कुटुंबाशिवाय कोणाचे आभार मानू इच्छितो, तर या तिघांचे. रोहित शर्मा देखील, त्यानेही शॉर्ट लेगला काही चांगले झेल घेतले आहेत. रोहितने स्लीपला अजिंक्य रहाणेची जागा भरून काढली.'

दरम्यान, अश्विन 100 कसोटी सामने खेळणारा भारताचा 14 वा खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीय क्रिकेटपटूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.

अश्विनने 100 व्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 4 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 100 कसोटीत 500 हून अधिक विकेट्स आहेत. तो भारताचा कसोटीत 500 हून अधिक विकेट्स घेणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसराच गोलंदाजीही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT