Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कसोटीतील 'हा' महारेकॉर्ड मोडण्याच्या उबंरठ्यावर अश्विन, द ग्रेट कुंबळेला मागे टाकून...

R Ashwin Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

R Ashwin Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना नागपुरात भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटीत एक ऐतिहासिक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

रविचंद्रन अश्विन जेव्हा नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दिसणार आहे, तेव्हा तो अनिल कुंबळेंचा कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडून ऐतिहासिक कामगिरी करेल.

अश्विन कसोटीतील हा महान विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे

टीम इंडियाचा (Team India) महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 विकेट घेतल्यास तो अनिल कुंबळेंचा मोठा विक्रम मोडेल. अनिल कुंबळेंचा हा विक्रम मोडण्यासाठी अश्विन उत्सुक आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 449 बळी घेणारा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक विकेट घेतल्यास अनिल कुंबळेला मागे टाकून इतिहास रचणार आहे.

कुंबळेला मागे टाकून अश्विन ऐतिहासिक कामगिरी करेल

नागपूर येथे खेळल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 बळी घेऊन रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरणार आहे. अनिल कुंबळेने 93 कसोटी सामन्यात 450 बळींचा आकडा गाठला. रविचंद्रन अश्विनच्या नावावर 88 कसोटी सामन्यांमध्ये 449 विकेट्स आहेत.

श्रीलंकेचा अनुभवी फिरकीपटू मुरलीधरनच्या नावावर विश्वविक्रम आहे

जर अश्विनने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात 1 बळी घेण्यात यश मिळवले तर अनिल कुंबळेला मागे टाकून तो भारतातील पहिला आणि कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, तो श्रीलंकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने 80 कसोटीत 450 बळींचा आकडा गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 450 विकेट घेणारा गोलंदाज

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)- 80 कसोटीत

2. अनिल कुंबळे (भारत) - 93 कसोटीत

3. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 100 कसोटींमध्ये

4. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 101 कसोटीत

5. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 112 कसोटीत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 कसोटी विकेट्स

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 कसोटी विकेट्स

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 675 कसोटी विकेट्स

4. अनिल कुंबळे (भारत) - 619 कसोटी विकेट्स

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 566 कसोटी विकेट्स

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 कसोटी विकेट्स

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 कसोटी विकेट्स

8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 460 कसोटी विकेट्स

9. रविचंद्रन अश्विन (भारत) - 449 कसोटी विकेट्स

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

1. अनिल कुंबळे - 619 कसोटी विकेट्स

2. रविचंद्रन अश्विन - 449 कसोटी विकेट्स

3. कपिल देव - 434 कसोटी विकेट्स

4. हरभजन सिंग - 417 कसोटी विकेट्स

5. इशांत शर्मा/झहीर खान - 311 कसोटी विकेट्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT