IND vs AUS: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची Playing 11 फिक्स! 'या' खेळाडूला मिळणार डच्चू

India vs Australia, 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Australia, 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल.

दरम्यान, 2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षानंतर भारतीय भूमीवर खेळवली जात आहे. 2017 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.

Team India
IND vs AUS: सुनिल अण्णाचा जावाई बनणार रोहितचा ओपनिंग पार्टनर! AUS कॅम्पमध्ये...

तसेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो सलामीवीर असेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलसह विस्फोटक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियासाठी सलामी देणार आहे. रोहित शर्मा भारतीय भूमीवर अत्यंत धोकादायक आहे.

अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावण्याची ताकदही त्याच्यात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल ही सलामीची जोडी ऑस्ट्रेलियासाठी घातक ठरणार आहे.

Team India
IND vs AUS: अहमदाबादमध्ये सामना पाहण्यासाठी PM मोदीसह ऑस्ट्रेलियाचे PM लावणार हजेरी

अष्टपैलू आणि फिरकीपटू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना मोठ्या प्रमाणात मदत करेल, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकतो. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन बॉलसोबतच बॅटने टीम इंडियाला मजबूत करतील.

त्याचबरोबर, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत रवींद्र जडेजाही फिरकी गोलंदाजी करेल, तेव्हा हे तिन्ही घातक फिरकीपटू ऑस्ट्रेलियन संघाचा नाश करतील. कर्णधार रोहित शर्मा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून अशा प्रकारे वगळेल.

Team India
IND vs AUS: टीम इंडियाचा 'हा' सुपरस्टार लवकरच मैदानात परतणार, ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ!

तो वेगवान गोलंदाज असेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल. अशा स्थितीत उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागणार आहे.

नागपूर कसोटीत भारताची प्लेइंग 11 अशी असू शकते:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Team India
IND vs AUS Test: टेन्शन नॉट! रोहित-विराटचा सर्वात मोठा शत्रू पहिल्या सामन्याला मुकणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

  • पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर

  • दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली

  • तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाला

  • चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com