Suyash prabhudesai Dainik Gomantak
क्रीडा

Mens T-20: पंजाबसमोर गोव्याची सपशेल शरणागती

मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पंजाबचा 9 विकेट, 26 चेंडू राखून सहज विजय

गोमन्तक डिजिटल टीम

(Mens T-20) पणजीः गोव्याच्या पुरुष संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी सपशेल नमते घेतले. परिणामी पंजाबला नऊ विकेट आणि तब्बल 26 चेंडू राखून सामना जिंकता आला.

जयपूर येथील जयपुरिया विद्यालय मैदानावर झालेल्या सामन्यात गोव्याची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. चार लढतीतीत त्यांचा हा सलग दुसरा पराभव ठरला. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 138 धावांची मजल मारली. पंजाबने 15.4 षटकांत 1 बाद 142 धावा करून सामना आरामात जिंकला. गोव्याचा स्पर्धेतील पाचवा सामना मंगळवारी (ता. 18) उत्तर प्रदेशविरुद्ध होईल.

अभिषेक शर्मा (54 धावा, 44 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार ) आणि प्रभसिमरन सिंग (74 धावा, 43 चेंडू, 3 चौकार, 6 षटकार) यांनी पंजाबला 12.5 षटकांत 109 धावांची सलामी दिली. गोव्याला तब्बल आठ गोलंदाज वापरावे लागले.

सुयशची एकहाती लढत

गोव्याची सामन्यातील सुरवात अत्यंत खराब ठरली. पाचव्या षटकांत 4 फलंदाज फक्त 26 धावांत गमावल्यामुळे गोव्याचा डाव संकटात सापडला. प्रतिकुल परिस्थितीत सुयश प्रभुदेसाईने एकहाती लढत दिली.

त्याने अगोदर एकनाथ केरकर याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करून संघाला सावरले, नंतर दीपराज गावकर याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करून संघाला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. डावातील तीन चेंडू बाकी असताना सुयश बाद झाला. त्याने 49 चेंडूंत दोन चौकार व चार षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः 20 षटकांत 7 बाद 138 (स्नेहल कवठणकर 11, वैभव गोवेकर 6, तुनीष सावकार 4, सिद्धेश लाड 3, सुयश प्रभुदेसाई 64, एकनाथ केरकर 23, दर्शन मिसाळ 0, दीपराज गावकर नाबाद 18, लक्षय गर्ग नाबाद 4, सिद्धार्थ कौल 4-28, बलतेज सिंग 1-20, मयांक मार्कंडे 1-27, हरप्रीत ब्रार 1-38) पराभूत वि. पंजाब ः 15.4 षटकांत 1 बाद 142 (अभिषेक शर्मा नाबाद 54, प्रभसिमरन सिंग 74, अर्जुन तेंडुलकर 2-0-12-0, अमित यादव 2-011-0, लक्षय गर्ग 3-0-18-1, दर्शन मिसाळ 2-0-15-0, सिद्धेश लाड 3-0-31-0, अमू्ल्य पांड्रेकर 2-0-31-0, दीपराज गावकर 1-0-15-0, सुयश प्रभुदेसाई 0.4-0-6-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT