Watch Video: भारतीय महिला संघाने सातव्यांदा 'Asia Cup' चे विजेतेपद पटकावल्यानंतर जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल

Women's Asia Cup Final Viral Video: सातव्यांदा आशिया चषक पटकावल्यानंतर भारतीय महिला संघाचा आनंद गगणात मावत नव्हता.
Women Asia Cup 2022:
Women Asia Cup 2022:Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय महिला संघाने सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरलं आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंका संघाचा आठ विकेट्सने पराभव केला. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला फक्त 66 धावाच करता आल्या. प्रत्युत्तर दाखल भारताने हे आव्हान दोन गडी आणि 8.3 षटकांमध्ये सहज पार केलं. रेणुका सिंह , राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांच्या भेदक माऱ्यानंतर स्मृती मंधानाने भारतासाठी (India) शानदार प्रदर्शन केले.

सातव्यांदा आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघाच्या आनंद गगणात मावत नव्हता. भारतीय महिला संघाने विजयी जल्लोष केला. चषकासह टीम इंडिया एन्जॉय करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Women Asia Cup 2022:
Goa Cricket: जीसीए अध्यक्षपदासाठी थेट लढत अपेक्षित

आशिया चषक जिंकणाऱ्या टीम इंडियावर (Team India) कौतुकांचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटूसह नेटकऱ्यांनाही महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com