Usman Tariq Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: क्रिकेट की सर्कस? विचित्र ॲक्शनवरुन जुंपली! तारिकच्या 'पॉझ'मुळे मिचेलनं सोडली क्रीज; मैदानातील 'हाय-व्होल्टेज' ड्रामा व्हायरल

Daryl Mitchell vs Usman Tariq PSL 2026 Controversy: पाकिस्तान सुपर लीग 2026 च्या रणधुमाळीत सध्या क्रिकेटच्या नियमावलीवरुन आणि 'फेअर प्ले'वरुन एक मोठा वाद पेटला आहे.

Manish Jadhav

Usman Tariq Bowling Action Controversy: पाकिस्तान सुपर लीग 2026 च्या रणधुमाळीत सध्या क्रिकेटच्या नियमावलीवरुन आणि 'फेअर प्ले'वरुन एक मोठा वाद पेटला आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेल आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सचा फिरकीपटू उस्मान तारिक यांच्यात एक अजब संघर्ष पाहायला मिळाला. उस्मान तारिक चेंडू टाकताना जो विचित्र 'पॉझ' घेतो, त्यामुळे मिचेलने चेंडू खेळण्यास चक्क नकार दिला. यामुळे मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी घटना रावळपिंडीच्या डावादरम्यान घडली. उस्मान तारिक जेव्हा गोलंदाजीसाठी धावून येतो, तेव्हा तो चेंडू सोडण्यापूर्वी काही क्षण अचानक थांबतो. तारिकच्या या कृतीमुळे आपली एकाग्रता भंग पावत असून टाइमिंग चुकत असल्याची तक्रार मिचेलने अंपायरकडे केली. एकाच ओव्हरमध्ये मिचेल अनेकदा क्रीजमधून बाजूला झाला आणि आपण खेळण्यासाठी तयार नसल्याचे संकेत दिले. या प्रकारामुळे समालोचकही चक्रावून गेले. माजी क्रिकेटपटू रमीज राजाने यावर भाष्य करताना म्हटले की, मिचेलने उस्मानच्या शैलीचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करायला हवा होता, अशा प्रकारे न खेळणे अयोग्य आहे.

मिचेलचा हा निषेध मात्र त्याच्याच अंगाशी आला. ज्या गोलंदाजी शैलीचा तो विरोध करत होता, त्याच उस्मान तारिकने डॅरिल मिचेलची महत्त्वाची विकेट काढत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. उस्मानने केवळ विकेटच घेतली नाही, तर 4 ओव्हरमध्ये 5.75 च्या किफायतशीर इकॉनॉमीने फक्त 23 रन देऊन फलंदाजांना जखडून ठेवले. उस्मान तारिकची ही गोलंदाजी शैली यापूर्वीही वादात राहिली आहे. ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हाही तिथल्या खेळाडूंनी तारिकच्या ॲक्शनवर आक्षेप नोंदवला होता. मात्र, अद्याप तरी तांत्रिकदृष्ट्या त्याच्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

सामन्याचा निकाल पाहता, क्वेटा ग्लॅडिएटर्सने रावळपिंडीचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे क्वेटाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे, रावळपिंडीच्या संघाची अवस्था बिकट असून सलग पाचव्या पराभवामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर कायम आहेत. उस्मान तारिकच्या या आगळ्यावेगळ्या गोलंदाजीने आगामी सामन्यांमध्ये इतर संघांसमोरही मोठे आव्हान उभे केले असून, त्याच्या ॲक्शनवरुन सुरु असलेला वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पीएसएल 2026 च्या उर्वरित सामन्यात आता अंपायर आणि आयोजक यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT