Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Mahesh Gawli India U20 head coach: महेश गवळी यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गुरुवारी भारताच्या २० वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.
Mahesh Gawli India U20 head coach
Mahesh Gawli India U20 head coachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गोमंतकीय महेश गवळी यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गुरुवारी भारताच्या २० वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथे जन्मलेल्या ४६ वर्षीय महेश यांच्याकडे दुसऱ्यांदा २० वर्षांखालील संघाचे प्रशिक्षपद आले आहे. यापूर्वी त्यांनी २०२२-२३ मध्ये ही जबाबदारी निभावली होती.

टाटा फुटबॉल अकादमीत प्रशिक्षित झालेल्या महेश गवळी यांनी एफसी कोचीनतर्फे खेळाडू या नात्याने व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीस सुरवात केली. नंतर गोव्यातील चर्चिल ब्रदर्स, तसेच कोलकात्यातील ईस्ट बंगाल, मुंबईतील महिंद्र युनायटेडतर्फे खेळल्यानंतर गोव्याचा नामवंत फुटबॉल संघ धेंपो स्पोर्टस क्लबमध्ये स्थिरावले.

Mahesh Gawli India U20 head coach
Goa Cancer Statistics: 5 वर्षांत गोव्‍यात 4,762 जणांचा कॅन्‍सरमुळे मृत्‍यू, प्रत्‍येक दिवशी सापडतात सरासरी पाच रुग्‍ण

या क्लबतर्फे ते २००७ ते २०१५ या कालावधीत खेळले. धेंपो क्लबतर्फे ते आय-लीग विजेते ठरले, तसेच एएफसी कप स्पर्धेतही छाप पाडली. ते २००८ मध्ये गोवा सरकारच्या दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित झाले. महेश यांनी ईस्ट बंगालतर्फे राष्‍ट्रीय फुटबॉल लीग, आसियान क्लब स्पर्धा, महिंद्र युनायटेडतर्फे राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन कप, आयएफए शिल्ड आदी स्पर्धांत विजेते ठरले.

‘सेंटर बॅक’ जागी हुकमी खेळाडू असलेल्या महेश यांनी १९९७ मध्ये भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. २००१ पासून ते भारतीय संघाच्या बचावफळीतील प्रमुख खेळाडू बनले. भारतीय संघातून खेळताना महेश एलजी कप (२००२), सॅफ करंडक (२००५ व २०११), नेहरू कप (२००७ व २००९), एएफसी चॅलेंज कप (२००८) विजेते ठरले. २००७ मध्ये भारताने नेहरू कप जिंकला तेव्हा महेश अंतिम सामन्याचे मानकरी ठरले होते.

Mahesh Gawli India U20 head coach
Goa Weather Update: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण, पारा 34 अंशांवर; शनिवारी पावसाची शक्यता

डिसेंबर २०११ मध्ये महेश आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाले. भारतातर्फे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर साठहून जास्त फुटबॉल सामने खेळले. काही सामन्यांत त्यांनी भारताचे कर्णधारपदही सांभाळले. आय-लीग स्पर्धेतील सर्वोत्तम बचावपटू हा पुरस्कार त्यांना एकूण पाच वेळा मिळाला. निवृत्तीनंतर महेश यांनी इंडियन ॲरोजचे साहाय्यक प्रशिक्षक, भारताच्या २० वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर २०२२ पासून महेश भारताच्या सीनियर पुरुष संघाचे साहाय्यक प्रशिक्षकपद भूषविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com