Goa Pro League Dainik Gomantak
क्रीडा

प्रो-लीग विजेतेपदासाठी चार संघ दावेदार

2021-22 मोसमातील स्पर्धेला आजपासून सुरवात, चाहत्यांना प्रवेश

Dainik Gomantak

Goa: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल विजेतेपदासाठी सर्व बाराही संघ इच्छुक आहेत, पण खरी चुरस चार प्रमुख संघांतच असेल. गतविजेता स्पोर्टिंग क्लब द गोवासह साळगावकर एफसी, धेंपो स्पोर्टस क्लब, चर्चिल ब्रदर्स संघ जेतेपदासाठी दावेदार असतील.

गोवा प्रो-लीग स्पर्धेच्या 2021-22 (Goa Pro League Tournament) मोसमाला शनिवारपासून सुरवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि पणजी फुटबॉलर्स यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर खेळला जाईल. कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचारासह चाहत्यांना स्टेडियमवर प्रवेश देण्याचा निर्णय गोवा फुटबॉल असोसिएशनने घेतला आहे.

स्पोर्टिंग क्लबने गतमोसमात एकही सामना न गमावता 11 लढतीतून 23 गुण प्राप्त करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले होते. कोरोना विषाणू महामारीच्या पहिल्या लाटेमुळे 2019-20 मोसम प्रभावित झाला होता. तेव्हा स्पर्धा अर्धवट राहिली होती, त्यानंतर स्पोर्टिंग व चर्चिल ब्रदर्सला संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.

गतमोसमात धेंपो स्पोर्टस क्लबने 21 गुणांसह उपविजेतेपद मिळविले होते. कळंगुट असोसिएशनने चमक दाखविताना 20 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. साळगावकर (20 गुण), वास्को क्लब (16), एफसी गोवा (16 गुण) या संघांना अनुक्रमे चौथा ते सहावा क्रमांक मिळाला होता. चर्चिल ब्रदर्स (15), यूथ क्लब मनोरा (14), पणजी फुटबॉलर्स (13), गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब (10) अनुक्रमे सातवा ते दहावा क्रमांक मिळाला. वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने आठ गुणांसह तळाचे स्थान टाळले, तर पाच गुणांसह सेझा फुटबॉल अकादमी संघ पाच गुणांसह तळात राहिला. मात्र कोविड-19 उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे जीएफएने सेझा अकादमीची पदावनती रद्द केली, त्यामुळे 2021-22 मोसमासाठी त्यांचे स्थान कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT