Police Football Cup Dainik Gomantak
क्रीडा

Police Football Cup: धेंपोचे ज्युनियर्स सीनियर्सना भारी

साळगावकर एफसी उपांत्य फेरीत दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी: धेंपो ज्युनियर्स संघाने आपल्या सीनियर्सना चकीत करत सामना टायब्रेकरद्वारे जिंकून 18 व्या गोवा पोलिस फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शिरसई येथील मैदानावर शुक्रवारी झालेल्या लढतीत ज्युनियर्स संघाने 1-1 गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटवर 5-4 फरकाने बाजी मारली.

(Police Football Cup Dhempo Juniors reached the semi-finals)

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर यजमान गोवा पोलिस संघ सनसनाटी निकाल नोंदविणार नाही याची दक्षता साळगावकर एफसी संघाने घेतली. त्यांनी सामना 4-2 फरकाने जिंकून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली.

टायब्रेकरवर ज्युनियर्स भारी

धेंपोच्या दोन्ही संघांतील सामन्यात निर्धारित वेळेतील गोल पहिल्या आठ मिनिटांच्या खेळात झाले. शेल्डन फर्नांडिसच्या फटक्यावर धेंपो क्लबच्या वेलिस्टर मेंडिस याने दुसऱ्याच मिनिटास चेंडू आपल्याच नेटमध्ये टाकल्यामुळे ज्युनियर्स संघाला आघाडी मिळाली. नंतर आठव्या मिनिटास नेसियो फर्नांडिसच्या गोलमुळे धेंपो क्लबने बरोबरी साधली. पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णायक ठरलेला धेंपो ज्युनियर्सचा मायरिक हिलेरियो सामन्याचा मानकरी ठरला.

साळगावकर एफसी वरचढ

यजमान गोवा पोलिस संघाने साळगावकर एफसीला तुल्यबळ फुटबॉल लढत दिली. मात्र उत्तरार्धातील दोन गोलमुळे माजी विजेत्यांनी उपांत्य फेरी पक्की केली. सौरभ पाटीलने साळगावकरला चौथ्याच मिनिटास आघाडी मिळवून दिली. सहाव्या मिनिटास अब्दुल खानने पोलिस संघाला बरोबरी साधून दिली.

कृष्णनाथ शिरोडकरने 19 व्या मिनिटास गोल केल्यामुळे साळगावकरला पुन्हा आघाडी मिळाली, पण 35 व्या मिनिटास भावेश कांदोळकरच्या गोलमुळे विश्रांतीला दोन्ही 2-2 गोलबरोबरी होते. नंतर 53 व्या मिनिटास सिद्धार्थ कुंडईकर याने, तर 90 व्या मिनिटास सॅम्युएल कॉस्ता याने केलेल्या गोलमुळे साळगावकर एफसीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

उपांत्य फेरी सहा सप्टेंबरला

स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने येत्या सहा सप्टेंबरला होतील. त्यावेळी धुळेर स्टेडियमवर धेंपो ज्युनियर्स व शापोरा युवक संघ यांच्यात, तर शिरसई येथील मैदानावर साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात लढत होईल. अंतिम सामना आठ सप्टेंबरला खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

SCROLL FOR NEXT