गोव्याचे निनाद दक्षिण विभागाचे ट्रेनर

निनाद पावसकर गोव्याचे माजी क्रिकेटपटू
Ninad Pawaskar
Ninad PawaskarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे माजी क्रिकेटपटू आणि आता ट्रेनर या नात्याने कार्यरत असलेले निनाद पावसकर यांना आगामी दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. थेट उपांत्य फेरीत चाल मिळालेल्या दक्षिण विभाग संघाचे ते ट्रेनर असतील.

(Ninad Pawaskar will train South Division team for the 'Dulip Karandak')

Ninad Pawaskar
Asia Cup 2022: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी काय म्हणाले, रोहित, राहुल आणि विराट

दुलिप करंडक स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघात गोव्याच्या एकनाथ केरकर आणि लक्षय गर्ग यांची निवड झाली आहे. आता या संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये निनाद यांनाही स्थान मिळाले आहे. ते गोवा क्रिकेट असोसिएशनचेही ट्रेनर आहेत. दक्षिण विभाग संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये निनादसह तमिळनाडूचे एम. व्यंकटरमण प्रशिक्षक, केरळचे जी. साजी कुमार व्यवस्थापक, कर्नाटकचे जाबा प्रभू फिजिओ, तर केरळचे साजी सोमण व्हिडिओ अॅनालिस्ट आहेत.

Ninad Pawaskar
Ind Vs Pak Asia Cup 2022: सामना कधी आणि कुठे पाहायचा, संघात कोण खेळणार...

गोव्याचे माजी क्रिकेटपटू

म्हापसा येथील निनाद गोव्याचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वयोगट क्रिकेट स्पर्धेत, तसेच सीनियर पातळीवर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012-13 साली त्यांनी पंजाबमधील एनआयएस पतियाळा केंद्रातून क्रिकेट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला, तसेच प्रशिक्षणातील बीसीसीआय लेव्हल-1 अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

तंदुरुस्ती प्रशिक्षणात यश

निनाद यांनी तंदुरुस्ती प्रशिक्षणातील लेव्हल-1 मान्यता मिळविली आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियन स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग असोसिएशनचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी लेव्हल-१ प्रमाणपत्र प्राप्त केले. याशिवाय मुंबईस्थित नॅशनल स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग असोसिएशनकडूनही त्यांनी लेव्हल-१ प्रमाणपत्र मिळविले आहे. निनाद सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) तंदुरुस्ती प्रशिक्षणातील तीन वर्षीय अभ्यासक्रमात सामील असून नुकताच पहिला टप्पा पूर्ण केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com