PM Narendra Modi laughing during an Indian boxer's story about a Pakistani player Dainik Gomantak
क्रीडा

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

PM Modi Funny Conversation With Indian Boxer Narender: खेळाडूंसोबत संवाद साधताना पंतप्रधान मोदींनीही तुफान फटकेबाजी केली आणि काही रंजक गोष्टी ऐकून तेही पोट धरुन हसताना दिसले.

Manish Jadhav

PM Modi Funny Conversation With Indian Boxer Narender: ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली. या यशस्वी स्पर्धेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी पदकविजेत्या सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. या भेटीदरम्यान अतिशय मोकळेपणाचे आणि आनंदी वातावरण पाहायला मिळाले.

खेळाडूंसोबत संवाद साधताना पंतप्रधान मोदींनीही तुफान फटकेबाजी केली आणि काही रंजक गोष्टी ऐकून तेही पोट धरुन हसताना दिसले. विशेषतः भारतीय बॉक्सर नरेंद्रने सांगितलेला एक गमतीशीर किस्सा ऐकून खुद्द पंतप्रधानांनाही हसू आवरता आले नाही.

राष्ट्रकुल स्पर्धेत 90 किलोपेक्षा जास्त वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या नरेंद्रने पंतप्रधान मोदींना 2015 मधील 'मिलिटरी गेम्स'मधील एक आठवण सांगितली. नरेंद्रने सांगितले की, त्या स्पर्धेत त्याची पहिली लढत एका पाकिस्तानी बॉक्सरसोबत होती. सामना सुरु होण्यापूर्वीच त्याला सैन्यातून फोन आला होता की, काहीही झाले तरी पाकिस्तानकडून (Pakistan) हरायचे नाही. नरेंद्रने तो सामना 4-1 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या एका लढतीत 3-2 ने विजय मिळवताना दोन्ही खेळाडूंचे डोके एकमेकांवर जोरात आदळले, ज्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

रुग्णालयात उपचार सुरु असताना त्या पाकिस्तानी बॉक्सरने नरेंद्रला सांगितले, "मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझे नाव नरेंद्र आहे, तुझ्या कोचचे नाव नरेंद्र राणा आणि तुझ्या देशाच्या पंतप्रधानांचे नावही नरेंद्रच आहे. भावा, मला आता या 'नरेंद्र' या नावाचाच प्रचंड तिरस्कार वाटू लागला आहे!" भारतीय बॉक्सरचा हा गमतीशीर संवाद ऐकून पंतप्रधान मोदींनाही हसू आवरता आले नाही.

या वेळच्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग पटूंनी जबरदस्त वर्चस्व गाजवले. भारतीय बॉक्सर्सनी एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पदके आपल्या नावावर केली, ज्यामध्ये नरेंद्रच्या चमकदार कामगिरीचा समावेश होता. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डामार थॉमसकडून पराभूत झाल्यामुळे नरेंद्राला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले असले, तरी त्याच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. भविष्यात तो भारतीय बॉक्सिंगला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT