Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

PBKS vs DC: 'अप्रतिम-अविश्वसनीय-अकल्पनीय…,' गब्बरने हवेत सूर मारत पकडला जबरदस्त झेल, पाहा Video

IPL 2023: धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात धवनने शानदार फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची शिकार केली. हे दृश्य 11व्या षटकात दिसले.

Manish Jadhav

IPL 2023: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या 64 व्या सामन्यात शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेत क्रिकेट चाहत्यांना थक्क केले.

धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात धवनने शानदार फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची (David Warner) शिकार केली. हे दृश्य 11व्या षटकात पाहायला मिळाले.

गब्बरचा अप्रतिम झेल

सॅम करन टाकत असलेल्या 11व्या षटकात वॉर्नरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. पाठीमागे धावत गब्बरने आपली नजर चेंडूवर ठेवली आणि अप्रतिम झेल पकडला.

राईली रुसोची स्फोटक फलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिल्यांदा फलंदाजी करताना 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. वॉर्नरशिवाय फॉर्मात नसलेल्या पृथ्वी शॉनेही चांगली खेळी खेळली.

त्याने 38 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 54 धावा केल्या. त्याचवेळी, राईली रुसोने 6 चौकार आणि 6 षटकारांसह 221 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह 37 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. फिल सॉल्टने 14 चेंडूत 26 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT