IPL 2023: तिकडे वडिलांना ICU मधून बाहेर काढलं अन् इकडे मोहसिन मुंबईविरुद्ध ठरला लखनऊचा हिरो

मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्ससाठी विजयाचा हिरो ठरलेल्या मोहसिन खान गेल्या काही महिन्यात कठीण परिस्थितीला सामोरे गेला आहे.
Mohsin Khan
Mohsin KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Mohsin Khan father got discharged from the ICU day before LSG vs MI Match: मंगळवारी (16 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 5 धावांनी पराभूत केले. लखनऊच्या या विजयासाचा मोहसिन खान नायक राहिला. त्याने गोलंदाजी केलेले अखेरचे षटक या सामन्याच्या निकालासाठी महत्त्वाचे होते. दरम्यान, मोहसिनसाठी गेले काही महिने चढ-उताराचे राहिले आहेत.

या सामन्यात मुंबईला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना मोहसिन खानने गोलंदाजी करताना केवळ 5 धावा दिल्या. त्यामुळे लखनऊला विजय मिळवणे सोपे गेले.

दरम्यान, या सामन्यानंतर मोहसिनने खानने खुलासा केला की या सामन्यापूर्वी त्याचे वडील 10 दिवस अतिदक्षता विभागात (ICU) होते. तसेच त्याला दुखापतीमुळे जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

मोहसिनच्या खांद्यावर ऑक्टोबर 2022 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बरेच महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते.

Mohsin Khan
Shubman Gill Century: गिलने सेंच्युरी तर केलीच, पण IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा बनला पहिलाच खेळाडू

दरम्यान, सामन्यानंतर मोहसिनने त्याच्या गोलंदाजीबद्दल आणि गेल्या वर्षाभराबद्दल प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'मी जो सराव केला आहे, त्याचीच अंमलबजावणी करण्याची योजना होती आणि मी त्याचीच अंमलबजावणी केली. माझ्याशी कृणालही चर्चा करत होता, तेव्हा मी देखील त्याला हेच सांगितले होते. मी रनअप बदलला नव्हता.'

'मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्कोअरबोर्ड पाहिला नव्हता, फक्त 6 चेंडू चांगल्याप्रकारे फेकली. कारण विकेट ग्रिप करत होती, त्यामुळे मी स्लोअर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यातील केवळ दोन चेंडू तसे टाकले, त्यानंतर यॉर्कर चाकले आणि चेंडू रिव्हर्सपण होत होते.'

तसेच मोहसिनने त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितले की 'माझ्यासाठी हा कठीण काळ होता. कारण मी दुखापतग्रस्त होतो आणि एक वर्षानंतर खेळत होतो. माझ्या वडिलांना कालच आयसीयूमधून बाहेर काढले, ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये होते.'

'मी त्यांच्यासाठी हे केले, ते हा सामना पाहात असतील. मी संघ, सपोर्ट स्टाफ, गौतम गंभीर सर आणि विजय दहिया सर यांचे आभारी आहे की त्यांनी मला गेल्या सामन्यात चांगली कामगिरी झालेली नसतानाही या सामन्यात खेळवले.'

Mohsin Khan
IPL Video Viral: रोहितची बॅटिंग अन् नवीन उल हकची बॉलिंग, पण जयघोष 'कोहली... कोहली...'चा

लखनऊच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्याने लखनऊच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या अखेरचा साखळी सामना जिंकल्यास ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. तसेच जर त्यांनी पराभव स्विकारला, तर अन्य संघांच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 177 धावा केल्या होत्या. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 47 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 89 धावा केल्या. तसेच कर्णधार कृणाल पंड्याने 49 धावा केल्या.

त्यानंतर मुंबईला 20 षटकात 5 बाद 172 धावाच करता आल्या. मुंबईकडून रोहित आणि ईशान यांनी सलामीला 90 धावांची भागीदारी केली होती. रोहितने 25 चेंडूत 37 धावांची खेळी केली, तसेच ईशानने 39 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यांच्यानंतक कोणाला खास काही करता आले नाही.

लखनऊकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहसिन खानने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com