Pat Cummins ICC
क्रीडा

IPL 2024 Auction: कमिन्सने घडवला इतिहास! वर्ल्डकप विजेता कर्णधाराला ऐतिहासिक 20.50 कोटींची बोली

Pat Cummins IPL Auction: पॅट कमिन्स आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction, Pat Cummins:

दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंची नावे चर्चेत होती. यातील एक नाव म्हणजे वर्ल्डकप 2023 विजेता कर्णधार पॅट कमिन्स.

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने या लिलावात इतिहास घडवला आहे. तो आयपीएल लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. त्याला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता.

त्यामुळे कमिन्सने इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनचा विक्रम मोडला आहे. सॅम करनला गेल्यावर्षी म्हणजेच आयपीएल 2023 लिलावात 18.50 कोटी रुपयांना पंजाब किंग्सने खरेदी केले होते. त्यावेळी तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण एकाच वर्षांनंतर त्याचा हा विक्रम कमिन्सने मोडला आहे.

कमिन्सची आयपीएल लिलावात महागडा ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याला 2020 आयपीएल लिलावातही 15.50 कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतले होते. दरम्यान, कमिन्स 2023 आयपीएल हंगामात खेळला नव्हता.

कमिन्सने जिंकल्यात मोठ्या स्पर्धा

कमिन्सने नुकतेच ऍशेस, कसोटी चॅम्पियनशीप आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धा कर्णधार म्हणून जिंकली आहे. तसेच त्याची घातक वेगवान गोलंदाजी आणि खालच्या फळीत फलंदाजीमध्ये योगदान देण्याची क्षमता त्याला खास बनवते. त्यामुळे या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठीही फ्रँचायझी मोठ्या रक्कमेची बोली लावतील अशी चर्चा यापूर्वीच होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे.

कमिन्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 42 सामने खेळले असून 45 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 379 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT