Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी!

PAK vs NZ: शाहिद आफ्रिदीच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या अंतरिम निवड समितीने या संघाची निवड केली आहे.

दैनिक गोमन्तक

PAK vs NZ: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या महिन्यात कराची येथे सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शाहिद आफ्रिदीच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या अंतरिम निवड समितीने या संघाची निवड केली आहे. काही नवीन आणि जुन्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वी निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत केल्याचे आफ्रिदीने सांगितले आहे. कराचीमध्ये 9 ते 13 जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या अंतरिम निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यात दुखापतीतून सावरल्यानंतर सलामीवीर फखर जमानचा समावेश करण्यात आला आहे. तर हरिस सोहेललाही मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी परत बोलावण्यात आले आहे. हरिसने ऑक्टोबर 2020 मध्ये पाकिस्तानसाठी (Pakistan) शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

तसेच, देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनकॅप्ड तय्यब ताहिरचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. तर शादाब खानच्या जागी उसामा मीरची निवड करण्यात आली आहे.

दुसरीकडे, कराचीत संघाची घोषणा करताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “मी सकाळी शादाबशी बोललो. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बरे वाटत नाही. यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) आगामी मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही.''

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, हरिस रौफ, हरिस सोहेल, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा , शाहनवाज डहानी, शान मसूद, तय्यब ताहिर आणि उसामा मीर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

SCROLL FOR NEXT