Pakistan  Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानने 14 वर्षीय खेळाडूला मैदानात उतरवत, बनवला होता विक्रम!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी देणे ही पाकिस्तान क्रिकेटची (Pakistan Cricket) ओळख राहिली आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी देणे ही पाकिस्तान क्रिकेटची (Pakistan Cricket) ओळख राहिली आहे. सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू या देशातून पुढे आले आहेत. अशाच एका खेळाडूने आजच्या दिवशी (Youngest Man To Play Test) पदार्पण करत सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विक्रम केला होता. तर या खेळाडूचे नाव होते हसन रझा (Hasan Raza). त्याने 24 ऑक्टोबर 1996 रोजी फैसलाबाद (Faisalabad) येथे कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी पाकिस्तानी संघांचा मुकाबला करणारा झिम्बॉव्बेचा संघ होता. हसन रझा याने पदार्पण केले तेव्हा त्याचे वय 14 वर्षे 227 दिवस होते. त्याने वयाच्या 15 वर्षे आणि 124 दिवसांच्या वयात त्याच्याच देशातील मुश्ताक मोहम्मदचा (Mushtaq Mohammed) पदार्पण करण्याचा विक्रम मोडला होता. हसन रझाचा विक्रम आजही अबाधित आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या जन्म प्रमाणपत्रांवर क्वचितच विश्वास ठेवला जातो. अनेकदा त्याच्याबद्दल बऱ्याच चुका आढळतात आणि वय कमी करण्याची प्रकरणेही कित्येकदा समोर आली आहेत. हसन रझाच्या बाबतीत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजिद खान (Majid Khan) म्हणाले होते की, पदार्पणाच्या वेळी ते किमान एक वर्ष मोठे होते.

हसन रझाच्या वयाबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले असले तरी, त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पण कसोटीत उत्तम कामगिरी होती. त्याने कमी स्कोअरिंग सामन्यात फलंदाजी करताना 27 धावा केल्या. त्यावेळी पाकिस्तानने हा सामना जिंकत, मालिका 1-0 ने आपल्या खिशात घातली होती. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. यानंतर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या खेळात उत्तम कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत त्याने 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजा कसोटीतून पुनरागमन केले आणि 54 आणि 68 धावांची खेळीही उभारली होती. पण या मालिकेत पाकिस्तान 3-0 ने पराभूत झाला होता.

हसन रझाची कारकीर्द कशी होती?

हसन रझा यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्याने सात कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्याने दोन अर्धशतकांच्या मदतीने 235 धावा केल्या. त्याच वेळी, तो एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करु शकला आणि त्याच्या नावावर 242 धावा नोंदवण्यात आल्या. पण हसन रझाने देशातंर्गत क्रिकेटमध्ये बरीच चांगली कामगिरी केली होती. त्याने 232 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतकांसह 13949 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 256 धावा होती. त्याने 197 लिस्ट ए सामन्यांमध्ये 39.35 च्या सरासरीने 5155 धावा केल्या. हसन रझा यांनी टी 20 क्रिकेटमध्येही आपली उपस्थिती ठेवली होती. त्याने 36 सामन्यांमध्ये 32.85 च्या सरासरीने 920 धावा केल्या.

हसन रझा पाकिस्तानसाठी शेवटची कसोटी 2005 मध्ये खेळला, अन् 1999 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तो इंडियन क्रिकेट लीग, भारताच्या क्रिकेट लीगमध्येही सामील झाला होता. परंतु त्याला करिअरचा फारसा काही फायदा झाला नाही. अशा प्रकारे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या 23 व्या वर्षी संपली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT