पाच वर्षानंतर भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे आमने सामने येणार आहेत आणि अवचित्य आहे ते म्हणजे ICC T20 World Cup. शुक्रवारी T20 World Cup साठीचे ग्रूप आयसीसीने (ICC) जाहीर केले. या ग्रूपमध्ये सुपर 12 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रूपमध्ये स्थान देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की क्रिकेट प्रेमींसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मेजवानी येत्या ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे. (India vs Pakistan World Cup: Fans eager to witness high voltage drama)
आयसीसीने या वर्षाच्या होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप शुक्रवारी जाहीर केले. ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत तसेच ग्रुप 2मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ असतील. ज्या क्षणी हे ग्रुप जाहीर झाले तेव्हापासुनच क्रिकेट चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान या मुकाबल्यासाठी आतुर आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 2016 मध्ये अखेरची टी-20 लढत झाली होती. तेव्हा टी-20 वर्ल्डकपमध्ये कोलकाता येथील लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ सहा विकेट राखत धूळ चारली होती.टी-20 वर्ल्ड कपचे सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान UAE आणि ओमान इथे होणार आहेत. एकूण 16 संघ यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसात निश्चितपणे जाहीर होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.