पाच वर्षानंतर प्रथमच भारत-पाकिस्तान आमने-सामने

क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकतेला उधाण, भारताची आजपासून वर्ल्डकप मोहीम सुरू
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

दुबई: अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) महामुकाबला आज दुबईच्या स्टेडियमवर सायंकाळी- 7.30 वाजल्यापासून रंगणार आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट विश्वकरंडक (T-20) स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकणारा भारत ही परंपरा कायम राखण्यासाठी लढणार आहे; तर सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागलेला पाकिस्तान नवी सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

India vs Pakistan
T20 World Cup: हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही ते अखेर विराटने केले स्पष्ट

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 या दोन्ही विश्वकरंडक स्पर्धांत मिळून भारताने पाकिस्तानवर 12-0 (यातील एक सामना टाय, पण तोही भारताने बॉलआउटमध्ये जिंकलेला) अशी मक्तेदारी गाजवलेली आहे. यजमान असलेला भारत पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातून विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम सुरू करणार आहे. त्यामुळे सर्वार्थाने हा सामना महत्त्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आणि सराव सामन्यातील शानदार कामगिरी ही मोठी ताकद भारतीयांकडे आहे; तर पाकिस्तानचा एका सराव सामन्यात पराभव झालेला आहे.

एकूणच काय तर भारताचे पारडे जड असले तरी भारतीय संघाला सावध रहावे लागणार आहे. भारतीयांसाठी पाकिस्तानच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता इतर खेळाडू नवखे आहेत, त्यामुळे ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ हे ब्रिद लक्षात ठेवून भारतीय संघाला दक्ष राहावे लागणार आहे.

India vs Pakistan
खलिद जमील आयएसएलमधील पहिले भारतीय मुख्य प्रशिक्षक!

भारत-पाकिस्तान आमने-सामने

ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत एकूण पाच लढती पाचही लढतीत भारताचा विजय एक लढत टाय होती, पण बॉलऑउटमध्ये भारताचा विजय झाला होता. दोन्ही संघांत ट्वेन्टी-20 चे एकूण आठ सामने, त्यात सात लढतीत भारताचा विजय झाला होता. सातपैकी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना आणि चार सामन्यांत धावांचा पाठलाग करताना भारताचाच विजय झाला पाकिस्तानचा एकमेव विजय बंगळूरमध्ये 2012 मधील सामन्यात झाला होता. आता दुबईच्या स्टेडियमवर प्रथमच एकमेकांविरुद्ध भारत-पाकिस्तान आमने-सामने खेळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com