फोंडा: सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे किती अंगाशी येऊ शकते, याचा प्रत्यय फोंडा येथे आला आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या फोंड्यातील एका अल्पवयीन मुलीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणाऱ्या धाराशिव (महाराष्ट्र) येथील १९ वर्षीय युवकाला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. तेजस बराडे असे या संशयित युवकाचे नाव असून, त्याला बुधवारी गोव्यात आणण्यात आले आहे.
मुलीकडून फोटो मिळताच तेजसने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. त्याने ते खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. फोटो व्हायरल न करण्यासाठी त्याने मुलीकडे पैशांची मागणी केली. या धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने सुरुवातीला कोणालाही काही न सांगता त्याला काही रक्कम पाठवली. मात्र, तेजसची पैशांची हाव वाढतच गेली आणि तो वारंवार पैशांसाठी तगादा लावू लागला.
मुलीच्या वागणुकीतील बदल आणि तिच्याकडे पैशांची कमतरता जाणवल्याने ही बाब अखेर तिच्या पालकांच्या लक्षात आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सर्व प्रकार पालकांना सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकांनी तातडीने फोंडा पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तेजस बराडे याच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुलीशी संबंधित आणि सायबर गुन्ह्याचे स्वरूप असल्याने फोंडा पोलिसांनी या प्रकरणाची दखल युद्धपातळीवर घेतली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित तेजस बराडे याचे लोकेशन धाराशिव, महाराष्ट्र येथे ट्रेस केले. फोंडा पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने धाराशिवला रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तेजस बराडे (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले असून, त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत. संशयिताने यापूर्वी अशा प्रकारे इतर कोणत्याही मुलींना फसवले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.